पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या भाकपतर्फे निषेध !!
चोपडा प्रतिनिधी.. शुक्रवारी पुण्यात झालेल्या निर्भय बनो कार्यक्रमात जाताना महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, ॲडवोकेट असीम सरोदे यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो निंदनीय आहे. त्या हल्ल्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष निषेध करतो व अशावेळी राज्यात सदसद्विवेकबुद्धी असणाऱ्या प्रत्येकाने अशा पत्रकारांच्या पाठीमागे उभे राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पक्षाचे कॉम्रेड अमृत महाजन एका पत्रकाद्वारे केले आहे.
यावेळी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढे त्यांनी म्हटले आहे की आपण डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे, डॉक्टर / पत्रकार कलबुर्गी अशा नेत्यांना गमावलेले आहे, गाडी खाली कुत्रा मेला तर थोडेफार दुःख होणारच असे वाक्य एका भाजप नेत्यांनी मागे केले होते त्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशी भाषा वापरत आहेत हे निंदनीय आहे परंतु महाराष्ट्र राज्यात रोज सुरू असलेला हिंसक घटना व जातीय दंगली पेटवण्यासाठी सोशल मीडियातून केले जाणारे प्रचार कट कारस्थाने अफवा पसरवणे महापुरुषांना धर्माचे लेबल लावून राजकारणासाठी धर्माचा वापर करणे असे समाजाच्या विविध घटकांमध्ये पसरवण्यासाठी केले जाणारे खेळ आपण पाहत आहोत, असे प्रचार करणाऱ्यांना राज्यात सत्ताधारी वर्गाच्या जनविरोधी धोरणांमुळे मेटाकुटीस आलेले शेतकरी, शेतमजूर, महिला कामगार, गलित गात्र बनलेला मध्यमवर्गीय, जनतेचे प्रश्न याच्याशी काही घेणे देणे राहिलेले नाही म्हणून अशा परिस्थितीत जनतेच्या पाठीमागे लोकशाही व संविधानाचा वापर करून उभे राहणारे वागण्यासारखे पत्रकार यांनी सत्य बोलू नये म्हणून असे हल्ले केले जात आहेत त्यामुळे महाराष्ट्र कधी नव्हे एवढा उध्वस्त होत आहे अशी असते लोकशाही स्वातंत्र्य टिकवणे चे काम वागळे सारखे पत्रकार करीत आहेत म्हणून त्यांच्या पाठीमागे उभे राहणे आवश्यक आहे असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ अमृत महाजन यांनी केले आहे
||सावधान||
ReplyDeleteरामराज्य भासवून "नथुराम राज्य येत आहे.. महाराष्ट्र भकास, आणि गुजरातचा विकास चालू.. शेतकऱ्याच मरण,
आणि शेटजी-भटजीच उदरभरण. चालू आहे देवाच्या नावाने दैत्य सत्तेत आले आहेत.. वेळीच सावध व्हा, नसता नाश जवळ आला आहे हुकुमशाही-डोकावतेय!!