Sunday, 11 February 2024

सिताराम बाबाजी तोरस्कर यांचे निधन !!

सिताराम बाबाजी तोरस्कर यांचे निधन !!

मुंबई, (प्रतिनिधी) :
         रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कासार कोळवण गावचे जेष्ठ नागरिक सिताराम बाबाजी तोरस्कर ( वय -८१ वर्ष ) यांचे काल (दि.११/२/२०२४) रोजी रात्री ठिक ११ वाजता निधन झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटूंबासाठी खर्च केले. पूर्वी ते मुंबईत मिल कामगार होते. मिल बंद झाल्यानंतरही ते मुंबईला छोटी मोठी नोकरी करत होते. नोकरी करून कुटूंबाचा गुजारा करत होते. त्यांना गावची खूप आवड होती. स्वर्गीय सीताराम तोरस्कर यांचे गावासाठी मोठे योगदान आहे. त्यांचे वाडी, गाव, तालुका, जिल्हा आणि मुंबई सह उपनगर मधील अनेक नातेवाईक यांच्याशी चांगले सलोख्याचे संबंध होते. काल त्यांच्या परिवारातील जेष्ठ  व्यक्ती (सीताराम तोरस्कर) लोप पावली आहे याचे दुःख परिवाराला आहे. त्यांच्या पच्छात दोन मुलगे, पुतणे, सुना, नातवंडे असा असा मोठा परिवार आहे त्यांच्या दुःखात वाडी, गाव सह मोहन कदम आणि परिवार तसेच सर्व संघर्ष विकास समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सभासद सहभागी असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व कुटूंबास दुःख पचविण्याची शक्ती  परमेश्वर त्यांना देवो अशी भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...