Sunday, 11 February 2024

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे ५ दिवशीय शिवजयंती उत्सवाचे आयोजन !!

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे ५ दिवशीय शिवजयंती उत्सवाचे आयोजन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
           महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) या संस्थेच्या माध्यमातून दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ ते २२ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान ५ दिवशीय शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्थेचे हे पाचवे वर्ष आहे. ५ दिवशीय उत्सवाच्या आयोजनाचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार प्रत्येक घराघरांत पोहोचावेत. याकरीता वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा याचे ऑनलाईन आणि ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये ऑफलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे, ज्या व्यक्तींना या स्पर्धेत ऑनलाइन पद्धतीने सक्रियतेने सहभाग नोंदवायचा आहे, त्यांनी संस्थेच्या अधिकृत Email id
ajinkyayuvaprathishthan@gmail.com वर आपली चित्रित केलेली व्हिडीओ, चित्र, निबंध दिनांक १७/२/२०२४ पूर्वी पाठऊन द्यावीत व संस्थेच्या सदस्यांशी संपर्क साधावा ही विनंती. शिवजयंती निमित्त खालील विविध विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

चित्रकला स्पर्धा -

5 वी ते 8 वी विषय -१) शिवाजी महाराज्याचे गडकिल्ले २) शिवाजी महाराज्याचे कोणताही एक ऐतिहासिक प्रसंग तर वक्तृत्व स्पर्धा-

इयत्ता 5 वी ते 9 वी -1) रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज 2) आज शिवाजी महाराज असते तर

निबंध स्पर्धा- (ओपन गट )

1) आजची तरुण पिढी आणि शिवाजी महाराज 2) छत्रपती शिवाजी महाराज्याची युद्ध नीती 3) आज शिवाजी महाराज असते तर आणि वक्तृत्व स्पर्धा- (ओपन गट)1) शिवाजी महाराज्याची महिलाविषयक धोरणे 

2) आजची तरुण पिढी आणि शिवाजी महाराज 3) अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे राष्ट्राला पुन्हा एकदा, जिजाऊंचा शिवबा पाहिजे असे विषय आहेत. 

यासाठी नियमावली-1) वक्तृत्व स्पर्धेत सहभागी स्पर्धकानी फक्त विषयाला अनुसरून10 मिनिटांत आपला विषय मांडावा त्याच्या वर वेळ गेल्यास स्पर्धकास बाद ठरवण्यात येईल .
2) कोणत्याही स्पर्धकांनी जाती वाचक, धर्मा विरोधात बोलू नये अन्यथा त्या स्पर्धकाला बाद ठरवण्यात येईल. 3) आपण पाठलेली व्हिडीओ चे मार्क 60 % परिक्षकांवर अवलंबून असतील आणि 40 %  मार्क संस्थेच्या अधिकृत युट्युब चॅनल वर पाठवण्यात आलेल्या  युट्युब वरील कमेंट आणि व्हीव वर अवलंबून असेल. 4) कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार आयोजकांवर राहील.5) स्पर्धकांनी आपली व्हिडीओ, निबंध, चित्र 17 फेब्रुवारी 2024 पूर्वी पाठवावी अशी आहे. विजेत्या स्पर्धकांना संस्थेच्या माध्यमातून खालील प्रमाणे बक्षीस देण्यात येईल. प्रथम क्रमांक = प्रशस्तीपत्रक +सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक = प्रशस्तीपत्रक + सिल्व्हर मेडल, तृतीय क्रमांक = प्रशस्तीपत्रक + ब्राँझ मेडल असेल. 

तरी ज्या शाळा, महाविद्यालय, स्थानिक मंडळ आणि स्वतः एखाद्या व्यक्तीस वरील उपक्रमात सक्रिय तेणे सहभाग नोंदवायचा आहे, त्यांनी  - निलेश कुडतरकर- 8693008261, प्रसाद मांडवकर -: 9768637534, गौतम बनसोडे - 8424895791, स्वाती गावडे - 8879991605, अनंत जोशी - 9821385850, साईनाथ खांबकर - 9920371228, रंजिता सावंत - 9022766278, विशाल शेट्टे -8104347929, अमित राणे - 9892066914 या व्यक्तीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...