Saturday 24 February 2024

अवैध सावकारावर उपनिबंधकाची कारवाई !!

अवैध सावकारावर उपनिबंधकाची कारवाई !!


उमरखेड, प्रतिनिधी : घराचे प्लॉटचे कागदपत्र गहाण ठेवून अवैध सावकारी व्यवसाय करणारा सावकार व्याजाच्या पैशासाठी तगादा लावत असल्याने तक्रारदाराने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे तक्रार दाखल केली. त्यामुळे उपनिबंधक पथकाने अवैध सावकाराच्या घरावर धाड टाकून घरातील संशयास्पद 161 कागदपत्रे जप्त केली. या कारवाईने अवैध सावकारी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

नारायण बाळा निमजवार (चिरडे नगर, महागाव रोड, उमरखेड) असे अवैध सावकारी करणार्‍या सावकाराचे नाव आहे. त्याने उमरखेडमधील शिवाजी वॉर्डातील रहिवासी श्याम तुकाराम गोसावी यांच्या घराचे कागदपत्रे ठेवून व्याजाने पैसे दिले होते. दिलेल्या पैशाचा व्याजापोटी हा सावकार तगादा लावत असल्याने श्याम गोसावी यांनी 15 जानेवारी 2024 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे तक्रार दिली होती.

त्यावर गुरवार, २३ फेब्रुवारी अर्जाच्या अनुषंगाने पडताळणीसाठी उपनिबंधक सावकारी पथकाने नारायण निमजवार याच्या चिरडे नगर येथील घरावर धाड टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान निमजवार याच्या घरातून संशयास्पद कोरे चेक, कोरे स्टॅम्प पेपर, खरेदी खत, नोंदी असलेल्या डायर्‍या व हिशोबाच्या चिठ्ठ्या असे एकूण 161 कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कागदपत्रांची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...