Thursday, 7 March 2024

शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध !!

शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध !!

** आक्षेप नोंदवण्यासाठी १३ मार्चपर्यंत मुदत
पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ.८ वी) परीक्षेची इयत्तानिहाय व पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, असे परिषदेच्या उपायुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
 
उत्तरसूची www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली असून अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईनरित्या १३ मार्च २०२४ पर्यंत नोंदवता येतील. ऑनलाईन निवदेन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये नोंदवता येईल. मुदतीनंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाईन निवेदनाशिवाय टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी कोणत्याही प्रकारे नोंदवलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
 
**ऑनलाईन निवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती करण्याची कार्यपद्धती__

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन निवेदनपत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग आदी दुरुस्ती करण्यासाठी १३ मार्च २०२४ पर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अन्य कोणत्याही पद्धतीने तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही उपायुक्त श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा !

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा ! पुणे, प्रतिनिधी : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आ...