केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज मा. कपिल पाटील यांचा वाढदिवस व महिला दिनानिमित्त हळदीकुंकू समारंभाचे आयोजन !!
*** आयोजक - कल्याण शहर सरचिटणीस निता देसले व कल्याण शहर उपाध्यक्ष सुधिर वायले
कल्याण, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष कल्याण शहर पश्चिम यांच्या तर्फे मा. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी दि. ०८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता *** मंगेशी इलाईट, डॉन बॉस्को प्री स्कूल जवळ, रामबाग -४ (शेवटी), चिकणघर, कल्याण पश्चिम येथे आयोजित केले आहे.
यावेळी होम मिनिस्टर, लकी ड्रॉ कुपन द्वारे आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत व येणाऱ्या सर्व माता भगिनींचा वाण देऊन सन्मान केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या कल्याण शहर सरचिटणीस निता देसले, भारतीय जनता पक्षाचे कल्याण शहर उपाध्यक्ष (संस्थापक अध्यक्ष - अलका सावली प्रतिष्ठान) सुधिर वायले, वार्ड क्रमांक २३ अध्यक्षा भारती बुटाला व पदाधिकारी, सहकारी यांनी केले असून प्रभागातील तसेच शहरातील महिलांना हे निमंत्रण स्वीकारुन उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment