Thursday, 7 March 2024

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य अधिवेशन कल्याणात, शासनाचे प्रधान सचिवासह जिल्हाधिकारी राहणार उपस्थितीत !!

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य अधिवेशन कल्याणात, शासनाचे प्रधान सचिवासह जिल्हाधिकारी राहणार उपस्थितीत !! 

*** मागण्या मान्य न झाल्यास सुमारे पाच लाख कर्मचारी विरोधात करणार मतदान 

कल्याण, (संजय कांबळे) ::महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी  कल्याण महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या १० मार्चला कल्याणातील के.सी गांधी स्कुल मैदानावर होणार असून यासाठी शासनाचे अप्पर मुख्य सचिव, मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव, अनुपकुमार यादव, सौरभ विजय, ठाणे जिल्हाधिकारी, अशोक शिनगारे, आदी मंत्रालयातील अति वरीष्ठ अधिकारी मंडळी उपस्थित राहणार असून या अधिवेशनात आमच्या विविध मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या लोकसभा निवडणुकीत संघटनेचे सुमारे ५ लाख सदस्य व कर्मचारी यांना सत्ताधां-यांच्या विरोधात मतदान करण्यास भाग पाडू असा इशारा अध्यक्ष अरुण गाडे यांनी कल्याण येथील पत्रकार परिषदेत दिला आहे.

कास्ट्राईब महासंघाची स्थापना १९७४ साली झाली. शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेत्तर, आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या समस्या, जुनी पेन्शन, खाजगीकरण, यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे, नोकर भर्ती बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, यांचे प्रश्न सुटलेले नाहीत, राजप्रत्रित वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी, नर्सेस, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक यांचे प्रश्न तसेच आहेत.

शासन जाणूनबुजून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत भेदभाव करत आहे, यामुळे शासनाला जागे करण्यासाठी कल्याणात महासंघाचे राज्य स्तरीय अधिवेशन१०मार्च रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत होत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर सचिव मिलिंद म्हैसकर, महिला व बालकल्याण सचिव अनुपकुमार यादव, वित्त सचिव सौरभ विजय, जिल्हाधिकारी, अशोक शिनगारे, शिक्षण सहसचिव टि वा करपते, महिला व बालकल्याण उपसचिव वि रा ठाकूर, साप्रचे सुदाम आंधळे, ग्रामविकासचे विजय चांदोरकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवाय कर्मचारी व सदस्यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन गाडे यांनी केले आहे.

सदरचे अधिवेशन हे दोन सत्रात होणार असून यावेळी विविध मागच्या शासनाला सादर करण्यात येणार आहेत. महासंघाचे कर्मचारी व सदस्य संख्या सुमारे ५ लाखाच्या वर आहे. त्यामुळे आमच्या मागच्या मान्य न झाल्यास या सर्व कर्मचारी व सदस्यांना सत्ताधारी यांच्या विरोधात मतदान करण्यास भाग पाडू असा इशाराच महासंचाचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी कल्याण येथील पत्रकार परिषदेत दिला, यावेळी अनिल धांडे, उपाध्यक्ष, सुशिल तायडे, सहसचिव, संजय धनगर जिल्हाध्यक्ष, ठाणे, अँँड गुलाब खंडारे, अशोक पाटील, शाहुराव सवई, आदी मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...