कल्याण तालुक्यातील रोहन, चौरे, नवगाव आणि बापसई गावातील सिंमेट काँक्रीटीकरण रस्त्याचे आ. किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील आणि मुरबाड मतदार संघात समावेश असलेल्या रोहन, चौरे नवगाव आणि बापसई या गावातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्याच्या सिंमेट काँक्रीटीकरण करण्याच्या कामांचे भूमिपूजन मुरबाड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आज झाले, यावेळी आपला मतदारसंघ कँन्सर मुक्त करण्याचा निर्धार आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने केला, यावेळी त्यांच्या सोबत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तसेच जीवनदिप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोंडविदे, योगेश धुमाळ, रवींद्र टेंबे, अशोक टेंबे, सोमनाथ टेंबे, संदेश टेंबे, दिलीप टेंबे, या गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मुरबाड मतदारसंघाचा चेअरा मोहरा बदलण्याचा विडा आमदार किसन कथोरे यांनी उचलला आहे, आणि तो प्रत्यक्षात देखील आणला आहे, जे काही थोडेफार कामे राहिली आहेत, त्यांचा पाठपुरावा ते सतत घेत असतात, याचाच परिपाठ म्हणून आज कल्याण तालुक्यातील रोहन, चौरे, नवगाव, बापसई या गावातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या सिंमेट काँक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झाले, विशेष म्हणजे ते स्वतः ज्या ग्रामस्थांचे भिंत किंवा पाय-या, ओटा हा रस्त्यावर येत होते, त्यांना ते काढण्यासाठी आमदार सांगत होते, त्यामुळे लोक देखील विना तक्रार ते अतिक्रमण काढून घेण्यास मान्यता देत होते, या कारणांमुळे आमदार कथोरे यांचे गावा गावात महिला औंक्षन करत होत्या.
या कामांचे भूमिपूजन प्रथम चौरे गावात, नंतर रोहन गावात, येथे मंदिरात छोटे खानी कार्यक्रमात आमदारांचा सत्कार करण्यात आला. यानंतर नवगाव येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी येथील रस्त्याची अवस्था पाहून खरेच हा रस्ता होणे अत्यावश्यक असल्याचे दिसून आले. यापुढे बापसई गावातील रस्त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात आमदार कथोरे यांनी सांगितले की, माझ्या मतदारसंघात डांबरमुक्त रस्ता हा संकल्प केला आहे, तो जवळपास पुर्णत्वास गेला असून याप्रसंगी प्रत्येक गावातील महिलांना त्यांनी आजच्या महिला दिनाचे निमित्ताने आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले, कँन्सर हा शंभर टक्के बरा होतो, तो पहिल्या स्टेप मध्ये असेल तर बरा होतो मात्र दुसऱ्या व तिसऱ्या स्टेप मध्ये असेल तर तो मृत्यू अटळ आहे असे त्यांनी सांगितले, त्यामुळे महिलांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असे सांगून माझा मतदारसंघ हा कँन्सर मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला, शिवाय शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नये, अन्यथा हा विकास काय कामाचा? अशी भिती ही त्यांनी व्यक्त केली.
भविष्यात बापसई - रुंदा पुल, बापसई - नाशिक हायवे, हे रस्ते करणार असल्याचे सांगितले, तसेच मुंबई वडोदरा एक्सप्रेस मुळे ५० ते ६० मिनिटात पनवेल, सीएसटी येथे जाता येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे विकासासाठी थोडाफार त्याग करावा, आपापसात भांडू नये, तूमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी सक्षम आहे असे सांगून प्रत्येक, आदीवासी, कातकरी, गोरगरिबांना घरे देतो, तूम्ही प्रस्ताव पाठवा, इष्टांक वाढवून मंजुरी मिळविण्याची जबाबदारी माझी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चौरे, रोहन, नवगाव, बापसई आदी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment