लाल बावटा शेतमजुर युनियन तर्फे भाजपा हटावं शेतमजूर बचाव मोहीम !!
चोपडा, प्रतिनिधी.. लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे चोपडा येथे आयटक कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील अखिल भारतीय खेत मजदूर युनियन बैठकीचा रिपोर्टवर का अमृत महाजन यांनी माहिती दिली.
अध्यक्षस्थानी जळगावचे कॉम्रेड भास्कर सपकाळे होते. या बैठकीत येत्या 26 मार्चपर्यंत जिल्ह्यात तीन ठिकाणी शेतमजुरांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचे ठरले. दिनांक 18 मार्च चोपडा, 19 मार्च अमळनेर, 20 मार्च जळगाव येथील तालुका तहसीलदार कार्यालयांवर धरणे व मोर्चा आणि 26 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्याचे ठरले. बैठकीला जाते जिल्हा सचिव वासुदेव कोळी, सरफराज शहा बाबू शहा, अशोक गायकवाड व श्रीमती पाटील उपस्थित होत्या.
या बैठकीत शिरपूर येथील कष्टकरी जनतेचे वकील कॉम्रेड एडवोकेट दिवंगत मदन परदेशी यांना सर्व कार्यकर्त्यांनी दोन मिनिट मौन पाडून श्रद्धांजली वाहिली.
No comments:
Post a Comment