Friday, 14 June 2024

कलगी तुरा परंपरेतील "श्री सुंकाई देवी नृत्य कलापथक -अडुर(मुबंई) शाखेचा ६ व्या वर्षात दमदार पदार्पण !!

कलगी तुरा परंपरेतील "श्री सुंकाई देवी नृत्य कलापथक -अडुर(मुबंई) शाखेचा ६ व्या वर्षात दमदार पदार्पण !!

[ मुबंई : उदय दणदणे ]

मुंबईतील विविध नाट्यगृहात कोकणची बहुप्रिय लोककला शक्ती-तुरा (जाखडी नृत्य) कार्यक्रमांचे फलक झळकू लागले असून, खऱ्या अर्थाने ह्या मोसमातील शक्ती-तुरा सामने सुरू झाले असल्याचे चित्र मुबंईतील नाट्यगृहात होत असलेल्या रसिकांच्या गर्दीने दिसून येते, ही लोककला जोपासण्यासाठी अनेक शाहिर लोककलावंत, नृत्य कलाकार, वाद्य-संगीतकार, आयोजक, निर्माते अहोरात्र मेहनत घेत असतात, त्यातीलच एक कलगी तुरा परंपरेतील जाखडी नृत्यात अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलेली "श्री सुंकाई देवी नृत्य कलापथक-अडूर (मुंबई) शाखेला ०५ वर्षे पूर्ण होत असून ही शाखा ०६ व्या वर्षात दमदार पदार्पण करत आहे. प्रत्यर्थ "श्री  सुंकाई देवी नृत्य कलापथक"-अडूर (मुबंई) वतीने कलापथक प्रमुख रोहित तुपट, प्रशांत मांडवकर, विकास तेलगडे आणि सहकारी वतीने शाखेस ५ वर्षे पूर्णत्वाचे औचित्य साधत रविवार दिनांक १६  जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, दादर-मुंबई येथे शक्ती-तुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, शक्तीवाले शाहीर -राजेश निकम व तुरेवाले शाहीर -सुशांत गराटे ह्या दोन युवा शाहिरांची जुगलबंदी रसिकांना पाहायला मिळणार आहे. "श्री  सुंकाई देवी नृत्य कलापथक"-अडूर (मुबंई) यांचा शक्ती-तुरा कार्यक्रमाचे हे पहिलेच आयोजन असून सदर कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रयोगाला, कलाक्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे उपरोक्त कला पथकाचे प्रतिनिधी रोहित तुपट व सहकारी यांच्या वतीने सांगण्यात येते, तरी तमाम कोकण कलाप्रेमी रसिकांनी सदर शक्ती-तुरा (जाखडी नृत्य) कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थितीत राहावे...

अधिक माहितीसाठी प्रशांत मांडवकर-७०४५१६५३६४  रोहित तुपट-८७८८११३०६९, विकास तेलगडे-७०३९६२५२६३  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...