Saturday, 13 July 2024

मुंब्य्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीची निवेदनाद्वारे मागणी !!

मुंब्य्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीची निवेदनाद्वारे मागणी !!

मुंब्रा, प्रतिनिधी : शहरातील तमाम आंबेडकरी जनतेची तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी मुंब्रा-कौसा कमिटीची अनेक वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मुंब्रा शहरामध्ये उभारावा अशी मागणी होती, त्यासाठी सदर कमिटीतर्फे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदनातर्फे मागणी करण्यात आली असून लवकरच पुतळा उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही निवेदन देण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनाही निवेदन देण्यात आले आहे. 
अशी माहीती मुंब्य्रातील युवा नेतृत्त्व बुद्धभूषण गोटे यांनी दिली. 

निवेदन देण्यासाठी समाजसेवक भुजंग साळवी, संतोष भालेराव, अनिता साळवी, जितू अडांगळे, दीपक साळवी, मयूर कांबळे, धीरेंद्र मिश्रा, श्री. सिंग, कुणाल निकाळे, शनिदास कांबळे, किरण गोटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...