Tuesday, 2 July 2024

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्यावतीने मा.श्री.अनिल परब यांचा सत्कार !!

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्यावतीने मा.श्री.अनिल परब यांचा सत्कार !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :                              
       मुंबई मतदारसंघातून मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना नेते श्री.अनिल परब साहेब विजयी झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंत विठ्ठल खोपकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव संदीप चादीवडे, संचालक दौलत बेल्हेकर, विश्वनाथ जाधव, वसंत घडशी आदी मान्यवर उपस्थित होते.शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब  ठाकरे गट) प्रमुख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आणि राज्याचे माजी परिवहनमंत्री अशी ऍड. अनिल दत्तात्रय परब यांची राजकीय ओळख आहे.ते ठाकरे कुटुंबीयांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी ते एक आहेत.मागील २० वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना तीनदा विधानपरिषदेवर पाठवले आहे. शिवसेनेचे संकटमोचक म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो.याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असते.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...