Saturday, 13 July 2024

पुणे येथे आयोजित ७१ व्या महिला गटराज्य अजिंक्यपद निवड चाचणीसाठी मालवणच्या श्रावणी घाडीगावकर हीची निवड !!

पुणे येथे आयोजित ७१ व्या महिला गटराज्य अजिंक्यपद निवड चाचणीसाठी मालवणच्या श्रावणी घाडीगावकर हीची निवड !!

 मुंबई (शांताराम गुडेकर) :
                 पुणे येथे दि. १८ जुलै ते २० जुलै या कालावधीत आयोजित ७१ व्या महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शिरवडे येथील मूळ रहिवाशी घाटकोपर येथे वास्तव्यास असलेली श्रावणी अरुण घाडीगावकर हीची निवड झाल्याने तिथे अभिनंदन होत आहे. मुंबईच्या शिरोडकर स्पोर्टस क्लब संघाच्या ५ मुलींची मुंबई शहर ह्या संघात निवड झाली यामध्ये श्रावणी घाडीगावकर हिचा समावेश असून श्रावणी हिची दोन वेळा मुंबई कब्बडी संघात निवड झालेली आहे तिची आता पुणे ७१ व्या महीला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणीसाठी निवड झाल्याने घाटकोपर येथील सामाजिक कार्यकर्ते शरद भावे यांच्यासह अनेकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...