Friday, 12 July 2024

बांधकाम कामगारांना मोफत ‘गृहोपयोगी वस्तू संच वाटप’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !!

बांधकाम कामगारांना मोफत ‘गृहोपयोगी वस्तू संच वाटप’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !!

पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी नि:शुल्क ‘गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना’ सुरू करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांनी योजनेचा लाभ घ्यावा आणि योजनेच्या लाभासाठी मध्यस्थासोबत व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जीवित नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ वितरीत करण्यात येतो. बांधकाम कामगारांनी योजनेच्या लाभाच्या अनुषंगाने कोणत्याही मध्यस्थ, दलाल किंवा अन्य कोणत्याही मध्यस्थ व्यक्तिसोबत आर्थिक व्यवहार करू नये. अशा व्यवहारातून कामगारांची फसवणूक व दिशाभूल झाल्यास त्यास कामगार उप आयुक्त जबाबदार राहणार नाही. याबाबत पोलीस विभागाकडे रितसर तक्रार करावी. जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्ह्याचे कामगार उप आयुक्त अभय प. गिते यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...