Saturday, 7 September 2024

संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी पद्मश्रीअण्णासाहेब जाधव व डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन साजरा केला शिक्षक दिन !!!


संस्थापक शिक्षण महर्षी पद्मश्रीअण्णासाहेब जाधव व डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन साजरा केला शिक्षक दिन !!


मुंबई प्रतिनिधी : विश्वनाथ राऊत: पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचालित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम या रात्र शाळेमध्ये संस्थेचे संस्थापक व शिक्षण महर्षी पद्मश्री परमपूज्य श्री पांडुरंग धर्माजी जाधव (भूतपूर्व राज्य सभा सदस्य) आणि डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन (भूतपूर्व राष्ट्रपती) यांची संयुक्त जयंती सोहळा व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक गौरव समारंभा गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी  सायंकाळी 06:30 वाजता रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत सर यांच्या अध्यक्षतेखाली रात्र शाळेचे शिक्षक श्री समाधान खैरनार सर, मासूम संस्थेचे स्कूल लीडर श्री योगेश वीरकर सर, श्री प्रमोद गीते या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी रात्र शाळेचे मुख्याध्यापक यांनी शिक्षण महर्षी पद्मश्री अण्णासाहेब जाधव व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवन विषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच शिक्षक दिनी  गुणगौरव समारंभात दहावीच्या प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आले. मार्च 2024 एसएससी परीक्षेचा निकाल 100% लावणाऱ्या शिक्षकांचे उल्लेखनिय योगदानाबद्दल शिक्षकांना प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्ताने इयत्ता 10 वीचे विद्यार्थी  शिक्षक होऊन त्यांनी संपूर्ण रात्र शाळा सांभाळत शिक्षिक होण्याचा अनुभव घेतला. शिक्षकांचे कार्य किती अवघड असते हे त्यांनी त्यांच्या सांगितलेल्या अनुभवातून दिसून आले. शिक्षक झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन गुलाब पुष्प देऊन मुख्याध्यापकांनी केले. 


रात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना म्हणून दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी विशाखा समिती व सखी सावित्री समितीची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या संपूर्ण शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी बीएमसीकडे मागणी करण्यात आली. त्याचबरोबर तक्रार पेटी बसवण्यात आली आहे त्याचा वापर कसा करायचा याबद्दल सुद्धा मार्गदर्शन समिती कडून विद्यार्थ्यांना करण्यात आले.


आरोग्यविषयक मार्गदर्शन डॉ. अंजली तलवलकर मॅडम तसेच सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन विनोबा भावे पोलिस स्टेशन, कुर्ला येथील API विजया गावडे मॅडम तसेच PSI हिना कचरे मॅडम यांनी केले. तसेच समुपदेशक म्हणून कविता कांबळे या ह्या उपस्थित होत्या. तसेच माजी विद्यार्थी राकेश राक्ष व विद्यार्थी प्रतिनिधी या सर्वांचा समावेश समितीमध्ये करण्यात आला आहे.


शिक्षक दिनानिमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रात्र शाळेचे शिक्षक श्री समाधान खैरनार सर यांनी केले. शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे व समिती सदस्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...