कल्याण, सचिन बुटाला : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रविवारी रात्री जाहीर झालेल्या उमेदवारी यादीमध्ये कल्याण पश्चिमेतून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मंगळवार हा उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व आरपीआय यांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार विश्वनाथ भोईर यांनी शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
एकीकडे ढोल ताशांचा गजर साथीला ब्रास बँड आणि कोण आला रे कोण आला, विश्वनाथ भोईर आगे बढो, शिवसेना झिंदाबाद आदी घोषणांच्या निनादामध्ये विश्वनाथ भोईर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्यामध्ये अनेक माजी नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
महायुती अभेद्य असून कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. पक्षाअंतर्गत काही वाद असतील त्यांचे म्हणून त्यांनी असे निर्णय घेतला असेल पण अर्ज परत घेण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत सर्व वाद मिटलेले असतील व आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार असा ठाम विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला.
यावेळी विश्वनाथ भोईर यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव, विजया पोटे, शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, गणेश जाधव, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, माजी नगरसेवक वैशाली विश्वनाथ भोईर, विद्याधर भोईर, मोहन उगले, छाया वाघमारे, श्रेयस समेळ नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, चिराग आनंद, विभागप्रमुख रामदास कारभारी, युवासेनेचे सूचेत डामरे, प्रतिक पेणकर यांच्यासह कल्याण, मोहने, टिटवाळा भागातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व आरपीआयचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment