Saturday, 5 October 2024

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी वसई तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज !

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी वसई तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज !

वसई (पालघर) दि.०५ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ अंतर्गत जूनी पेन्शन (OPS) योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे गांधी जयंतीपासून वर्धा येथे आमरण उपोषण सुरू आहे. आमरण उपोषण करणाऱ्या करणाऱ्या पेंशन फायटर यांच्या समर्थनार्थ व जूनी पेन्शन योजना लागू न करणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ वसई तालुक्यातील सर्व शाळांमध्ये आज दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले व शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. 

     महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या पालघर जिल्हा महिला आघाडी प्रमुख उत्तरा जाधव व खाजगी शाळा प्रमुख किरण गायकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जुनी पेन्शन लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनीही यावेळी काळ्या फिती लावून कामकाज केले व आपल्या सहकाऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...