Sunday 27 October 2024

काँग्रेसला कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व मधून उमेदवारी न मिळाल्याने सचिन पोटे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे !!

काँग्रेसला कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व मधून उमेदवारी न मिळाल्याने सचिन पोटे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे !!

** मुंबई आणि कोकण प्रांतात काँग्रेसला पुरेसं प्रतिनिधित्व नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी 

काँग्रेस पक्ष संपण्याच्या भीतीने सामूहिक राजीनामे __

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली शहरात काँग्रेसच्या वाटेला एकही जागा न आल्याने कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त सामुहिक राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात चार विधानसभा येतात कल्याण पूर्व कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण डोंबिवली शहर या चारही जागेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकही जागा न सुटल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी दर्शविली आहे 

येत्या दोन दिवसात पक्षाने योग्य तो निर्णय न घेतल्यास कल्याण डोंबिवली शहरातील सर्व पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देतील तसेच आगामी निवडणुकीत एकाही उमेदवाराचा प्रचार प्रचार न करता शांत राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत सचिन पोटे यांनी सांगितले. तसेच
विधानसभे पाठोपाठ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या असून या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जर स्थान नसेल तर पुढील काळात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व धोक्यात येणार असून अस्तित्वाच्या लढाई करिता हा निर्णय आम्ही घेतला असल्याचे पोटे यांनी पत्रकारांना सांगितले आहे 
महाविकास आघाडीने गुप्तपणे बैठका घेत सचिन बासरे यांना उमेदवारी जाहीर केली असून सचिन बासरे यांनी टिटवाळा येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आपल्या प्रचारास सुरुवात केली तसेच कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याचा त्यांनी सापटा लावला आहे तर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता शिवसेनेने घाई घाईने उमेदवार घोषित केला असल्याचा काँग्रेसचा दावा आहे 

भाजपातून काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटकर यांनी सांगितले शिवसेनेने दोन दिवसापूर्वीच सचिन बासरे. यांना उमेदवारी दिली आहे परंतु बासरी यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विचारात न घेता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता प्रचारास सुरुवात केली असून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारीबाबत कोणतीही माहिती न देता प्रचार सुरू केल्याचा आरोप राजाभाऊ पातकर यांनी केला आहे. महायुतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाने जर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्यास महायुतीचे उमेदवार सचिन बासरे यांना याचा मोठा फटका बसू शकतो तसेच महायुतीच्या उमेदवाराला याचा मोठा फायदा होऊ शकतो त्यामुळे सचिन पोटे यांनी केलेले बंड वरिष्ठ कशा पद्धतीने थंड करण्यात यशस्वी होतात ते येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

यावेळी कल्याण डोंबिवली सरचिटणीस राकेश मुथा, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सलीम शेख, ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर, राष्ट्रीय काँग्रेस सेवा दल अध्यक्ष लालचंद तिवारी, महिला जिल्हा अध्यक्ष कांचन कुलकर्णी, मोहने ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे यांसह कल्याण डोंबिवली शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण पश्चिम महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांचा शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल !!

कल्याण पश्चिम महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांचा शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल !! कल्याण, सचिन बुटाला : राज्या...