Saturday, 9 November 2024

संजय भालेराव यांचा जोरदार प्रचार !!

संजय भालेराव यांचा जोरदार प्रचार !!

** प्रचार सभा, कॉर्नर सभांना नागरिकांचा प्रतिसाद 

घाटकोपर, (केतन भोज) : पश्चिमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले संजय भालेराव यांच्या मतदारसंघातील प्रचारफेरी कॉर्नर सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते- पदाधिकारी संजय भालेराव यांच्या विजयासाठी घाटकोपर पश्चिमच्या विकासाचा विडा हाती घेऊन विजयाची मशाल पेटवण्यासाठी झटताना दिसत आहेत. संजय भालेराव यांनी या मतदासंघामध्ये अनेक विकासात्मक कामे केली आहेत. शिवभक्त संजय दादा अशी त्यांची घाटकोपर मधील तरूणाई मध्ये ओळख आहे. घाटकोपर पश्चिम मध्ये भाजपाचे राम कदम विरुद्ध मविआकडून ठाकरे गटाचे संजय भालेराव आणि मनसेचे गणेश चुक्कल अशी तिरंगी लढत होणार आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...