निष्ठेने लढलो तसं,निष्ठेने जनसेवा करत राहणार - संजय भालेराव !!
घाटकोपर, (केतन भोज) ; राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदासंघात ५९.६५% इतके मतदान झाले. त्यानंतर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी उबाठाचे संजय भालेराव, भाजपचे राम कदम आणि मनसेचे गणेश चुक्कल यांच्यात तिरंगी लढत झाली. तर याठिकाणी मतमोजणीत खरी टक्कर संजय भालेराव आणि राम कदम यांच्यात झाली. भाजपचे राम कदम यांना एकूण ७३१७१ मते भेटली तर उबाठाचे संजय भालेराव यांना ६०२०० इतकी मते मिळाली यात भाजपचे राम कदम हे १२९७१ मताने विजयी झाले. तर मनसेचे गणेश चुक्कल यांना फक्त २५८६२ एवढी मते पडली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय भालेराव यांचा यावेळी निसटता पराभव झाला असला तरी त्यांनी बऱ्यापैकी चांगली टक्कर विरोधी उमेदवार यांना याठिकाणी दिलेली दिसली. यावेळी शिवभक्त संजय भालेराव यांनी बोलताना म्हटले की माझा निसटता पराभव झाला असला तरी ज्या मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यांच्यासाठी मी माझे कार्य अविरतपणे चालू ठेवणार आहे. जसं मी निष्ठेने लढलो तसं निष्ठेने जनसेवा करत राहणार. निवडणूक म्हणलं की जय - पराजय हा आलाच, त्याला काही अपवाद नाही. परंतु या पराभवाने खचून न जाता त्याच जोमाने जनतेसाठी उभा राहणारच असतो तो " सच्चा शिवसैनिक " हिंदुहृदसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी माझ्या घाटकोपरसाठी, घाटकोपर करांसाठी ताकदीने संघर्ष करत राहणार असा विश्वास यावेळी शिवभक्त संजय भालेराव यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment