घाटकोपर येथील यशवंत खोपकर याना समाजभूषण पुरस्कार, तर मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ ने सन्मानित !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. यावर्षी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या विक्रोळी पार्क साईट येथील समाजसेवक, मुक्त पत्रकार याना प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र संस्थापिका अध्यक्ष प्रेरणा (दीप्ती) गावकर, वैभव कुलकर्णी व सर्व पदाधिकारी,सदस्य आणि सभासद यांच्या उपस्थित सन - २०२४ वर्षाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार-२०२४ सौ.दिप्ती वैभव कुलकर्णी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या शुभ हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार समारंभात यशवंत खोपकर यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या त्यांच्या शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेला राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ देऊन गौरविण्यात आले.
रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी श्री बल्लाळेश्वर मंगल कार्यालय, भारत कॉलेज रोड, हेंद्रेपाडा, बदलापूर (प.) येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.या पुरस्कार साठी संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य, वैद्यकीय, क्रीडा आदींचा समावेश केला आहे. सामाजिक कार्य क्षेत्रातून यशवंत खोपकर यांना समाजभूषण तर त्यांच्या संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार दिला. गेली अनेक वर्ष यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि हितचिंतक मुंबई सह मुंबई पूर्व -पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना, दिव्यांग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत. तसेच दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. यशवंत खोपकर आणि मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था याना या सेवा कार्यासाठी यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या याच कार्याचे कौतुक म्हणून त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ देऊन गौरविण्यात आले असे आयोजकांकडून सांगण्यात आले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, संदीप चादीवडे सचिव, दौलत बेल्हेकर संचालक, वसंत घडशी कार्यालय प्रमुख, मेघा सावंत, वनिता वायकर, राजेंद्र पेडणेकर, शरद धाडवे, सागर इंगळे यांचाही यानिमित्ताने प्रेरणा फाउंडेशनच्यावतीने सत्कार करण्यात आला. यशवंत खोपकर यांना सन - २०२४ वर्षाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार-२०२४ आणि त्यांच्या शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेला राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ देऊन गौरविण्यात आल्याबद्दल कोकणातील विविध मंडळ, सामाजिक संस्था, समाज मंडळ, विक्रोळी, घाटकोपर, ईशान्य मुंबई सह मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर मधील अनेक मंडळ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवार यांच्यातर्फे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment