२५ व्या वर्धापनदिनानिमित्त कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा विक्रोळी- घाटकोपरतर्फे भव्य मिरवणूक, सामाजिक मेळावा, दिनदर्शिका-२०२५ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी- घाटकोपरतर्फे शाखेच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य मिरवणूक, सामाजिक मेळावा, दिनदर्शिका-२०२५ चे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन विक्रोळी पार्क साईट शिवाजी मैदान, विक्रोळी (प.) मुंबई -७९ येथे रविवार दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३-३० ते ९ या वेळेत करण्यात आले आहे. सुरुवातीला दुपारी ३-३० वा.राम नगर शिवसेना शाखा क्रमांक १२७ येथून मिरवणूक सुरु होणार असून ती अमृत नगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुण पुढे बँक ऑफ इंडीया मार्गे सुजाता हॉटेल आशिर्वाद सोसायटी जवळून संदेश विद्यालय ते विद्यादीप शाळेकडून खाली साईबाबा मंदीर असे करून श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे समारोप साठी सायंकाळी ५ ते ५-३० वाजेपर्यंत पोहचेल.
या कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृ संस्थेचे पदाधिकारी, युवक मंडळ पदाधिकारी, बळीराज सेना पदाधिकारी, कु.स.संघ शाखा विक्रोळी-घाटकोपर पदाधिकारी, सदस्य, सभासद,महिला मंडळ पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, आजी -माजी पदाधिकारी, सदस्य, वधू - वर सूचक मंडळ पदाधिकारी, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित रहाणार आहेत. तरी सर्व कुणबी समाज बांधव, भगिणी, युवावर्ग सर्वांनी आपला बहुमुल्य वेळ समाज्यासाठी द्यावा आणि सहकार्य करून सहभागी व्हावे असे कु.स. संघ मुंबई विभागीय शाखा विक्रोळी - घाटकोपर पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment