नालासोपारा शहरात सायबर गुन्हे वाढताहेत; नागरिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन दरोडे, !
**सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वराज अभियान संघटनेच्या पदाधिकारीनी घेतली भेट..
नालासोपारा ता, १६ :- नालासोपारा शहरात सायबर गुन्हे वाढले असुन याबाबत शहरात फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांपेक्षा फसवणूक झालेले प्रकार जास्त आहेत. अनेक जणांची फसवणूक पन्नास हजार ते १लाख रूपये दरम्यान झालेली आहे. ही लोक सायबर क्राईम विभागाकडे तक्रार घाबरून देत नाही. बँक खात्यातून गायब झालेली ही रक्कमही लाखोंचा घरात आहे.
यासंदर्भात रोज महिला व उच्च शिक्षित विद्यार्थी यांच्या खात्यामधून हजारो रूपये गायब होत असल्याची तक्रार स्वराज अभियान संघटनेच्या रूचिता नाईक यांच्याकडे घेऊन येत असतात. वाढत्या इंटरनेटच्या वापरांमुळे लोकांचे आयुष्य तर अधिक सहज सोपे झाले आहे. पण, सोबतच यामुळे अनेक अडचणी देखील वाढल्या आहेत. अनेकदा नागरिकांना सायबर क्राईमसारख्या गोंष्टींबद्दल माहिती नसते. आणि त्याच्या नकळत ते सायबर क्राईमला बळी पडतात. यामुळे आतापर्यंत अनेकांना लाखो रूपयांचा फटका सहन करावा लागला आहे. हॅकर्समुळे आणि कधी- कधी लोकांच्या निष्काळजीपणामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
ऑनलाईन फ्रॉड, ओटीपी घेऊन फसवणूक, एटीएम कार्डद्वारे फसवणूक, ऑनालाईन व्यवसायचे लालच देऊन फसवणूक, मल्टी लेव्हल मार्केटींग, सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक, हॉकींग करुन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहे.
याबाबत सायबर क्राईम व पोलीस विभागाच्या माध्यमातून सायबर गुन्हे रोखण्यासंबंधी प्रसार व गुन्ह्यांविषयी जनजागृती झाली तरच नागरिक बळी पडणार नाहीत आणि गुन्ह्यांना आपोआपच पायबंद बसेल. त्यामुळेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती मोहिम करण्याबाबत स्वराज अभियान संघटनेचे अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी नी आज नालासोपारा पश्चिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वळवी यांची भेट निवेदन देण्यात आले. यावेळी स्वराज अभियान च्या रूचिता नाईक, राजेंद्र रांजणे, श्रीकांत जाधव, महेश निकम, समीर गोलांबडे,शिवसेना विभागप्रमुख दानिश करारी, जया गुप्ता, वंदना ढगे, शगुन गुप्ता , वंदना गाडगिळ, उपस्थित होते.
No comments:
Post a Comment