आंगवली (लाखणवाडी)ची सुकन्या कु.आश्लेषा रमेश गुडेकर राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य पदकाची मानकरी !
मुंबई (शांताराम गुडेकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु.पो.आंगवली (लाखणवाडी) येथील सुपुत्र सध्या मुंबई पूर्व उपनगर मधील भांडुप येथे राहत असलेल्या श्री.रमेश श्रीपत गुडेकर, सौ.रेश्मी र. गुडेकर यांची सुकन्या कुमारी असलेश्या रमेश गुडेकर हिने दिल्ली येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत यश प्राप्त करून १ सुवर्ण आणि २ रौप्य अशा ३ पदकांसह सर्व स्पर्धकांमध्ये रौप्य पदक प्राप्त केले आहे. अश्लेषाशी संपर्क साधला असता, माझे आईवडील आणि भाऊ यांचे पाठबळ, तिचे कोच निलेश गराटे सर, सोनाली नि. गराटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आणि माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली. त्यांच्यामुळेच हे यश संपादन करता आले. पुढे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन असेच यश संपादन करणार असा विश्वास तीने यानिमित्ताने व्यक्त केला. तीन महिने पूर्वी तीने वेस्ट बंगाल येथे झालेल्या वेटलीपटिंग स्पर्धामध्ये आपल्या कमी वयात मनाचा तुरा रोवून बेंच प्रेस मध्ये ब्रॉन्झ पदक पटकवात आंगवली गावचे नाव रोशन केले. यापूर्वी तीने डेडलीफ्ट मध्ये गोल्ड, इन्टेरेस्टटे सिल्वर, ऑलव्हर ब्रॉन्झ, पार्टीसिपशन मेडल असे पाच पदके जिंकली आहेत.
"फेडरेशन कप नॅशनल पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप २०२४" ही स्पर्धा पॉवरलिफ्टींग इंडिया असोसिएशनच्या वतीने दिल्ली येथे दि. १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. गुरुवार दिनांक १९ डिसेंबर रोजी तिला स्पर्धेच्या ठिकाणी "रौप्य पदक" देवून इतर स्पर्धकांसह गौरविण्यात आले. दिल्ली येथे झालेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत ती सहभागी झाली होती. या स्पर्धेत गुणवत्ता सिद्ध करताना अश्लेषाने सर्व स्पर्धकांमधून दुसऱ्या क्रमांकाचे रौप्य पदक प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा राष्ट्रीय स्थरावर प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंमध्ये घेण्यात आली होती. त्यामुळे चांगले यश संपादन केल्याने तिच्यावर आंगवली (लाखणवाडी) येथील चैतन्य युवा मंडळ आंगवली लाखणवाडी या मंडळाचे सदस्य रमेश गुडेकर आणि परिवार तसेच आश्लेषा हिचे कौतुक होत असून अनेकांनी तिला अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या आहेत. तीचे प्राथमिक शिक्षण सुभाष बने यांच्या पराग विद्यालय मध्ये झाले असून ती मुंबई मधील रुईया कॉलेजमधून पदवीधर (बी.एम.एम) झाली आहे. आत्तापर्यंत तिला गोल्ड -२७, सिल्व्हर -९, ब्राँझ-२ अशी एकूण -३८ पदके मिळालेली आहेत. यामध्ये ज्युनिअर ग्रुपमधून गोल्ड,सिल्व्हर, ब्राँझ चा समावेश आहे. नॅशनल, स्टेट, डिस्ट्रिक्ट लेवलला ती खेळली आहे. तर सिनियर ग्रुप मधून (जुलै२०२४) पासून स्टेट लेव्हल- १ गोल्ड मेडल, नॅशनल लेव्हल ब्राँझ मेडल ची मानकरी आहे.
भावी आयुष्यात तिने तुकाराम मुंडे यांच्यासारखे निर्भीड, एक स्वच्छ प्रतिमा असलेले अधिकारी बनण्याचा तिचा मानस आहे. तो लवकरच पूर्णही होईल यात शंका नाही. कारण तिने गेल्या चार -पाच वर्षात एक डझन पेक्षा जास्त पदक या स्पर्धामध्ये मिळवली आहेत. तिचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असे मत यानिमित्ताने मंडळाचे अध्यक्ष संदीप लाखन यांनी व्यक्त केले आहे. त्याच बरोबर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, विद्यमान आमदार शेखर निकम, वशिस्ट मिल्क अध्यक्ष प्रशांत यादव, स्मिता लाड, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद संतोष थेराडे, उद्धव ठाकरे गट यांचे संगमेश्वर तालुका प्रमुख बंडया बोरुकर, जिल्हा प्रमुख विलास चाळके, महिला जिल्हा प्रमुख वेदा ताई फडके, माजी जिल्हा परिषद सदस्य मुग्धा ताई जागुष्टे, सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, माजी सभापती संतोष डावल, माजी सभापती मधुकर गुरव, संगमेश्वर तालुक्यातील पत्रकार बंधू यांनी आश्लेषा रमेश गुडेकर हिला पुढील आयुष्यासाठी चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सचिन तेंडुलकर, सानिया नेहवाल, आकांक्षा कदम यांच्या सारखे उत्कृष्ट खेळाडू बनवून तिने आपल्या गावाचे, वाडीचे, मंडळाचे नाव रोशन करावे अशा शुभेच्छा देत अभिनंदन केले.
आपल्या कमी वयात यश संपादन केल्यान तिच्यावर रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, मंडळ, समाज शाखा यांच्यातर्फे अभिनंदन केले जात आहे. सचिन तेंडुलकर, सानिया नेहवाल, आकांशा कदम यांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन उत्तम खेळाडू तर तुकाराम मुंडे यांच्यासारखा निर्भीड अधिकारी यांचा आदर्श ठेवून तिने उंच भरारी घेण्याचे तिचे स्वप्न उराशी बाळगले आहे. तिला एक आय.पी.एस अधिकारी बनायचे तिचे स्वप्न आहे. तिचे ते स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे या साठी लागेल ती मदत तिला करणासाठी आंगवली (लाखणवाडी)चे निर्भीड पत्रकार संदीप गुडेकर यांनी सांगितले आहे. तिच्या या यशा मागे तिचे कोच निलेश गराटे, सोनाली गराटे यांनी तिला चांगले मार्गदर्शन केल्यामुळे त्याचबरोबर तिचे आई -वडील यांनी वेळो वेळो चांगले सहकार्य केल्यामुळे तिने एक डझन पेक्षा जास्त पदक मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तिला कोणत्याही क्रीडा क्षेत्रात जी काही मदत लागेल ती मदत करू असे शशांक घडशी, सामाजिक कार्यकर्ते युयूत्सु आर्ते यांनी सांगितले. लवकरच तिचा चैतन्य युवा मंडळ यांच्यावतीने सत्कार मु. पो.आंगवली (लाखणवाडी) येथे केला जाईल असे मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष संदीप लाखन यांनी सांगितले. तिच्या या यशा मागे तिचे वडील -आई भाऊ, क्रीडा कोच निलेश गराटे, सोनाली गराटे यांची विशेष मेहनत आहे. त्याचबरोबर मंडळातील सर्व सदस्य यांचे बहुमूल्य मार्गदर्शन असल्याने तिने हे यश संपादन केले आहे असे आश्लेषा रमेश गुडेकर हिने बोलताना सांगितले. तिने आपल्या आई- वडील यांच्या बरोबर आंगवली गावाचे, लाखणवाडीचे त्याच बरोबर रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुकाचे नाव जगाच्या नकाशा वर नेऊन ठेवत उंच भरारी घेतली आहे.
No comments:
Post a Comment