Monday, 16 December 2024

कोकण सुपुत्र मोहन ज.कदम "राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट समाज सेवक पुरस्कार-२०२४ आणि माणुसकी रत्न पुरस्कार -२०२४ ने सन्मानित !!

कोकण सुपुत्र मोहन ज.कदम  "राज्यस्तरीय महाराष्ट्र  उत्कृष्ट समाज सेवक पुरस्कार-२०२४ आणि माणुसकी रत्न पुरस्कार -२०२४ ने सन्मानित !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. यावर्षी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मधील कासार कोळवण गावचे कोकण सुपुत्र मोहन जयराम कदम यांना " राज्यस्तरीय महाराष्ट्र उत्कृष्ट समाज सेवक  पुरस्कार-२०२४ आणि राज्यस्तरीय  माणुसकी रत्न पुरस्कार -२०२४ देऊन गौरविण्यात आले. रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी श्री बल्लाळेश्वर मंगल कार्यालय, भारत कॉलेज रोड, हेंद्रेपाडा, बदलापूर (प.) येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.

           या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका/अध्यक्षा सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य तपासी अधिकारी अँटिपायरसी मुंबई सेलचे रामजीत (जीतू)  गुप्ता, मा.ऍड.मोहन शुक्ला (अध्यक्ष औदुंबर साहित्य मंच व अध्यक्ष रेक्रिशन टेनिस क्लब एरंडोल जळगाव), पुणे माळीण गाव उद्धारचे मच्छिन्द्रनाथ रामचंद्र झंजारे, सौ.दिपाली शिरापूरे, (सुप्रसिद्ध समाजसेविका), प्रशांत पेंधे (सी. ई.ओ.पार्थ गारमेंट), तंत्रस्नेही शिक्षक (शैक्षणिक क्रांती) ठाणे, सेवक नागवंशी (राष्ट्रीय सरपंच दक्षिण झोन अध्यक्ष, सुप्रसिद्ध समाजसेवक, उद्योजक), मोहन कदम (सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रसिद्ध पत्रकार), दिलीप नारकर (बृहमुंबई होमगार्ड विभाग), अविनाश म्हात्रे (अध्यक्ष दीनदयाल कुष्ठरोग संस्था, अध्यक्ष), सौ.प्रियंवंदा तांबोटकर (आर.एस.पी.ऑफिसर  नवी मुंबई), संजय हिरु घुडे (ठाणे ग्रामीण पोलीस दल 1998), राजेश भांगे (उद्योजक,समाजसेवक), लेखा तोरसकर (जाणता राजा अभिनेत्री, समाजसेविका), लोकेश पाटील ( सामाजिक कार्यकर्ता ) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचे कासार कोळवणचे  माजी पदाधिकारी व साई भक्त  ज्यांनी मंडळाच्या उन्नती कामासोबत अनेक विविध संस्था मध्ये कार्यरत असून महान समाजकार्याचा वसा घेतला. ज्यांनी हेच काम आयुष्यभर गावात राहून गावासाठी केले असे त्यांचे वडीलांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. याची पोच पावती  म्हणून आतापर्यंत त्यांना अनेक महत्वाच्या व मानाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. समाजात कुठल्याही फळाची अपेक्षा न करता  निःस्वार्थी पणे काम करून सर्वाना बरोबर घेऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे नाव आज प्रसिद्ध  आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असा लौकीक असलेले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते श्री.मोहन जयराम कदम यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना अनेकांनी लाख लाख शुभेच्छा दिल्या असून पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जावो हिच , साई चरणी प्रार्थना केली आहे. मोहन कदम महाराष्ट्रात विविध संस्था, मंडळ, प्रतिष्ठान, समाज शाखा मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी समाज प्रबोधन करत समाजातील ज्या आवश्यक नाहीत अशा काही अनिष्ठ प्रथा बंद करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.ज्याच्या पासून वेळ, पैसा वाचेल असे कार्य ते करत आहेत. लोकांना  जेवढी मदत करता येईल तेवढी करायची आणि गरजेला घरच्या माणसासारखं धावायचं अशी ओळख मोहन कदम यांची आहे. त्यांना याकामी त्यांची पत्नी, मुले, भाऊ आणि मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभते. घरातून समाजसेवेचे मिळालेले बाळकडू आणि पत्नी, मुलांचे प्रेम या जोरावर मोहन कदम यशस्वी झाले आहेत.
            मला समाजसेवेचा वसा वडिलोपार्जित मिळाला आहे. लहानापासून आवड निर्माण झाली म्हणून जनसेवा ही ईश्वर सेवा असे समजून मी सतत काम करत असतो. लोकांचे आशीर्वाद हेच आमच्या साठी पुरस्कार आहेत असं मत मोहन कदम यांनी बोलताना व्यक्त केले. प्रेरणा फाउंडेशन व प्रेरणा  नाट्य मंडळ रंगमंच महाराष्ट्र पदाधिकारी, सदस्य, सभासद व त्यांच्या निवड समितीचे आणि त्यांच्या टीम वर्क ने कार्यक्रमाचे खूप सुंदर आयोजन आणि नियोजन उत्तम केले होते. त्याबद्दल मोहन कदम यांनी त्यांचे मनापासून  हार्दिक हार्दिक आभार आणि अभिनंदन केले .

No comments:

Post a Comment

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान !

वाढदिवसानिमित्त शंभर युवकांनी केले रक्तदान ! ** रक्तदात्यांचा आदर्श रक्तदाता ने सन्मान मुंबई, (केतन भोज) : भारतीय जनता पार्टीचे ...