शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त व्यंगचित्रकला स्पर्धाचे आयोजन !
ठाणे, प्रतिनिधी : स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्रकला स्पर्धा २०२५ (वर्ष १२ वे) साठी “व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील व्यंगचित्र पाठवण्याचे आवाहन.
शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्रकला स्पर्धा,आयोजित केली आहे. स्पर्धेचं हे १२वे वर्ष असून, या व्यंगचित्रकला स्पर्धेसाठी
१)बालव्यंगचित्रकार (वय वर्ष १५ खालील),
२)दिव्यांग स्पर्धकांसाठी विशेष गट
३)हौशी व्यंगचित्रकार - खुला गट (वय वर्ष १६ वरील)
४) स्पर्धेतील उत्कृष्ट सहभागासाठी पहिल्या तीन शाळांसाठी विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल
सर्व स्पर्धकांनी “व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील आपली व्यंगचित्र, अे ३ साईझ ( ४२ X ३० सेंमी ) पेपर मध्ये, तसेच व्यंगचित्राच्या मागे आपले संपूर्ण नाव, आपली जन्म तारीख/वय , स्पर्धक गट, मोबाईल नंबर, आपला पूर्ण पत्ता व बालव्यंगचित्रकारांनी आपल्या शाळेचं नाव लिहून, धर्मवीर आनंद दिघे चौक , मंगला हिंदी शाळेसमोर, कोपरी, ठाणे पूर्व ४००६०३ येथे दिनांक १६ जानेवारी २०२५ ते दि. २० जानेवारी २०२५ च्या दरम्यान सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पोहचवावीत.
परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत आयोजित केले जाणार आहे आणि गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते सायंकाळी ७.०० वाजता ठाणे महापालिका खुले कलादालन, अष्टविनायक चौक, मिठ बंदर रोड, ठाणे पूर्व येथे आयोजित करण्यात येईल.
टीप :
१.परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
२. व्यंगचित्राच्या पुढील भागात स्पर्धकाचे नाव लिहिलेली व्यंगचित्र स्पर्धेसाठी पात्र नसतील.
३.राजकीय नेत्यांची किंवा राजकीय किंवा जातीय सलोखा बिघडवणाऱ्या विषयांवरील व्यंगचित्र स्पर्धेसाठी आणि प्रदर्शनासाठी पात्र नसतील
४.एकदा पाठवलेली व्यंगचित्र ही पुन्हा परत मिळणार नाहीत
५. स्पर्धकांची व्यंगचित्र त्यांनी स्वखर्चाने आणि स्वतःच्या जबाबदारीवर पाठवलेल्या स्पीड पोस्ट अथवा कुरियर मार्फतही दिनांक २० जानेवारी पर्यंतच स्वीकारली जातील, त्यासाठी ९८३३१५८८०० या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.
६. ही व्यंगचित्रकला स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली आहे.
७. स्पर्धेच्या नियमांत आयत्यावेळी बदल करण्याचे सर्व अधिकार हे शिवसेवा मित्र मंडळ. ठाणे पूर्व कडे राखीव असतील.
अधिक माहितीसाठी संपर्क ९२२४१९९९७९/९७६८६८८२९७/९८६९४१३९११/९८३३१५८८००
No comments:
Post a Comment