Wednesday, 1 January 2025

५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल दमामे/तामोंड/भडवळे/कात्रण विद्यालयांचे घवघवीत यश !

५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल दमामे/तामोंड/भडवळे/कात्रण विद्यालयांचे घवघवीत यश !

कोकण - ( दिपक कारकर )

सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल दमामे या विद्यालयाने ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नॅशनल हायस्कूल मांदिवली तालुका दापोली येथे दि.१७ ते १९ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या विज्ञान प्रदर्शनात कु. स्नेहल सुरेश मळेकर इयत्ता आठवी हिने तयार केलेल्या सुरक्षित चहावाटप प्रतिकृतीला प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक मिळाला. 

विजयी स्पर्धेकाचे तसेच मार्गदर्शक मुख्याध्यापक अतुल पिटले,विज्ञान शिक्षक कुलाळ सर, विराज सावंत सर, निखिल हरावडे सर सौ. बुरटे मॅडम यांचे शाळा समिती चेअरमन माननीय श्री काका खेडेकर तसेच दमामे/तामोड ग्रामपंचायतचे सरपंच सौ. अर्पिता शिगवण, उपसरपंच श्री. गंगाराम हरावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विलास देवघरकर सर्व शाळा समित्यांचे सदस्य व ग्रामस्थ दमामे /तामोंड /भडवळे/ कात्रण यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. पुढील होणाऱ्या जिल्हास्तर प्रदर्शनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना नारी गौरव २०२४ - २५ पुरस्कार जाहीर.....

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना नारी गौरव २०२४ - २५ पुरस्कार जाहीर..... मुंबई, प्रतिनिधी ता ०५ :- समाजकार्यात भरीव काम...