Sunday, 5 January 2025

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना नारी गौरव २०२४ - २५ पुरस्कार जाहीर.....

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना नारी गौरव २०२४ - २५ पुरस्कार जाहीर.....

मुंबई, प्रतिनिधी ता ०५ :- समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना हक्काचे माहेर या  शिवराज बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतिने उत्कृष्ठ समाजसेविका म्हणुन नारी गौरव २०२४- २५ पुरस्कारासाठी निवड झाली असून १९ जानेवारी २०२५ ला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना २ जिवनगौरव व वसई तालुका गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. एक महिला आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर खूप काही करु शकते हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे रूचिता नाईक आहेत. आपल्या विचारांतून एक समाजसेवेची ज्योत प्रोज्योलित करुन आज ही ती अखंड पणे सुरुच ठेवली आहे.

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या वतिने नालासोपारातील नागरीकांसाठी मोफत रूग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहे. त्याचे उध्दघाटन शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे.
हजारो महिलांना मोफत शिवणकाम, मेहंदी, ब्युटी पार्लर, केक मेकींग, प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आले. युवक युवतींसाठी मोफत हॉटेल मॅनेजमेंट, बँकीग कोर्सेस, वर्षाचे बारा हि महिने मोफत उपलब्ध करून दिले व त्यांना जॉब ला हि लावण्यात आले.

सोपारा सामान्य रुग्णालयात रूग्णांसाठी एक्स रे मशिन बसवण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे मोफत २००० फॉर्म महिलांना वाटप करण्यात आले. शेकडो दिव्यांग बांधवांना मोफत दिव्यांग प्रमाणपत्र, साहित्य व पेन्शन मिळवुन दिली. संजय गांधी योजने मधुन विधवा महिलांना दर महिना पेन्शन सुरू करून दिली. तहसिलदार येथुन गरीब गरजू नागरीकांना मोफत दाखले उपलब्ध करून देण्यात आले.
शेकडो नागरीकांचे मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करून देण्यात आली.

शिवसेना कार्यालयात दर महिन्याला आधार कार्ड शिबीर, आरोग्य शिबीर, मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर, मोफत आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड, आभा कार्ड नागरीकांचे शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. महिलांवरील अत्याचार थांबावे यासाठी विशाखा समिती स्थापन करण्याबाबत महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आदेश काढले. समेळगाव स्मशानभूमीतील लाकडे ठेवण्यासाठी शेडचे काम केले. सोपारा सामान्य रुग्णालयातील रिक्त जागे वरील भरती व साहित्य हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून दिले. नालासोपारात दरवर्षी पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या नागरीकांना शासना कडुन मदत मिळवुन दिली.
 
पाणी समस्या , अनधिकृत बांधकाम, नैसर्गिक नाले,  रस्त्यावरील खड्डे अनधिकृत मोबाईल टॉवर , अशा अनेक समस्या शिवसेना महिला शहर प्रमुख रूचिता नाईक यांनी मार्गी लावले. यासाठी आमरण उपोषण हि केले होते.
शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केलेल्या भरीव कामगिरीची  दखल घेत त्यांना नारी गौरव २०२४ - २५ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे 

यावेळी रूचिता नाईक यांनी  आभार व्यक्त करत 
बदलत्या काळानुसार विविध क्षेत्रांमध्ये महिला प्रभावी कामगिरी करत असून, समाजकार्य व राजकारणात जास्तीत जास्त महिला सक्रियपणे सहभागी झाल्यास महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केले.

No comments:

Post a Comment

"सह्याद्रीचा प्रतिकैलास श्री क्षेत्र मार्लेश्वर"

"सह्याद्रीचा प्रतिकैलास श्री क्षेत्र मार्लेश्वर" मार्लेश्वर देवालय (मठ)आंगवली व मारळचे श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान येथे यात्र...