विनवळ येथे दिघे/दिघा परिवाराचा मेळावा उत्साहात संपन्न !
जव्हार-जितेंद्र मोरघा
आदिवासी समाजातील दिघा/दिघे परिवाराचा कुळ परिवाराचा मेळावा जव्हार तालुक्यातील विनवळ येथे परिवाराचे कुलदैवत हिरवा देव यांची पूजा करून मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्याची सुरवात प्रथम विनवळ बस स्थानकापासुन ते कार्यक्रमामंडप पर्यंत कुटुंबीयांनी सांबळ नाच, तारपा नाच, ढोल नाच या वाद्याच्या गजरात मिरवणूक काढून कुलदैवत यांचे पूजन करण्यात आले, त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यींनी आलेल्या प्रमुख पाहुण्याचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. तसेच दिघा/दिघे परिवारातील कुटुंबीयांनी कुलदैवताचे दर्शन घेतले आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले, तसेच प्रमुख पाहुण्यांनी कुटुंबीयांना कुटुबाविषयी मोलाचे असे मार्गदर्शन केले. दिघा/दिघे परिवारातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड अशा विविध तालुक्यातील दिघा, दिघे परिवार हा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश कोरडा यांनी केले. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व कुटुंबीयांना जेवण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मोखाडा तालुका उपनगराध्यक्ष नवशु दिघा, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, कमळु दिघा, माजी सभापती जव्हार तुळशिराम मोरघा, विनवळ सरपंच लिलावती भोरे, विठ्ठल थेतले, मधुकर दिघा, जिग्नेश दिघा, जितेश दिघा, गणपत दिघा, संजय दिघा, झिपर दिघा, वामन तराळ, संपत पवार, अँड.रवि थतले, कमळाकर भोरे, पत्रकार जितेंद्र मोरघा, विनवळ पो.पा. सुनिल खुताडे, केशव दिघा, काशिनाथ दिघा, प्रभाकर भुसारा, नवशु जंगली, अशोक भोरे ,उपसरपंच विनवळ रशा दिघा, कीसन दिघा, काशिराम थेतले, वसंत दिघा आणि दिघे, दिघा कुटुंबीय बहु संख्खेने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment