सिद्धार्थ महाविद्यालय आयोजित 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा १९४वा जयंती उत्सव संपन्न '!
मुंबई, प्रतिनिधी : सिद्धार्थ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा व साहाय्यक प्राध्यापिका राधा कनकामल्ला यांच्या पुढाकाराणे यावर्षी प्रथमच ३ जानेवारी २०२५ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता केले होते. ज्युनिअर कॉलेजच्या जेष्ठ प्राध्यापिका निर्मला कांबळे यांना प्रमुख व्याख्यात्या म्हणून आमंत्रित केले होते. सर्वप्रथम प्रथेप्रमाणे सावित्रीमाईंसह, बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फूले यांच्या प्रतिमांना व्यासपिठावर उपस्थित उपप्राचार्य डॉ. समिर ठाकूर, प्रा. छाया पावसकर, प्रा. बाभळगांवकर व डॉ. विष्णू भंडारे यांनी पुष्पहार अर्पण केला, तसेच मेनबत्ती, अगरबत्तीचे प्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.
निर्मला कांबळे म्याडमनी क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या समाजकार्याबद्दल व विशेषता महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याचे सविस्तर विवेचन मांडले. ज्या काळात महिलांना मनुस्मृती नुसार शिक्षण घेण्यास बंदी होती व त्यांना समाजात दुय्यम व पशूप्रमाणे वागणूक दिली जात होती, अशा काळात महिलांना शिक्षीत व साक्षर करण्याचे फार मोठे काम सावित्रीबाईंनी १८व्या शतकात ज्योतीबा फूले यांच्या भक्कम पाठिंब्याने व सोबतीने सुरू केले, त्यासाठी प्रस्थापित ब्राम्हण समाज्याच्या लोकांकडून त्यांना टिका व अनेक प्रकारे आत्याच्यार सहन केले. आज भारतातील असंख्य स्त्रिया शिकून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत व पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक, शैक्षणिक व नोकरीच्या ठिकाणी अशा सर्व क्षेत्रात शिक्षिका, डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा विविध उच्च पदावर कार्यरत आहेत ते फक्त सावित्रीबाईंनी आम्हाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिल्यामुळेच शक्य झाले आहे, असे निर्मला मॅडमनी आवर्जून उपस्थितांना सांगितले, तसेच त्या स्वतः एक प्राध्यापिका झाल्या हे केवळ आणि केवळ सावित्रीमाई मुळेच हे सांगताना त्यांना अक्षरशः गहिवरून आले.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात उपस्थित विद्यार्थि व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी सावित्रीमाईंच्या संपूर्ण जीवनकार्याविषयी प्रश्नमंजूशा आयोजित केली होती, ज्यामध्ये प्रत्येकांनी ३ प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित होते. यामध्ये ज्यांनी भाग घेऊन किमान दोन प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली त्यांना उत्तेजनारार्थ बक्षिसे देण्यात आली. प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे समालोचन प्रा. राधा व प्रा. सुनयना यांनी संयुक्तपणे यशश्विरित्या केले.
तसेच सदर कार्यक्रमात प्रा. उमाजी जाधव, प्रा. संजयकुमार बोरसे, डॉ.भावना राठोड, आयु राजू रोकडे यांनीदेखील सावित्रीमाईंच्या जीवनावर त्यांचे विचार व भावना व्यक्त केल्या. आमचे प्राचार्य डॉ. यु. एम. मस्के काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत याबद्दल दिलगिरी व्यक्त केली व सर्वांचे विशेषता महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा प्रा. राधा कनकमल्ला यांचे कौतूक केले, कार्यक्रमाचा समोरोप सामुहीक राष्ट्रगित गाऊन केला.
प्रा. राधा कनकामल्ला -
*अध्यक्षा, महिला विकास कक्ष, सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई -१*
सौजन्य - अश्विनी निवाते
No comments:
Post a Comment