आप रिक्षा टॅक्सी वाहतूक संघटना सलग्न श्रमिक विकास संघटनेचा कल्याण आरटीओ येथे मोर्चा !
कल्याण, प्रतिनिधी : दिनांक 2 जानेवारी 2025, बुधवार रोजी आप रिक्षा-टॅक्सी वाहतूक संघटना यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण. (R.T.O) ला भेट देऊन सीएनजी बाटला टेस्टिंग सेंटर्स चे ट्रेड सर्टिफिकेट रद्द करण्याबाबत निवेदन पत्र दिले. व कल्याण रिक्षा - टॅक्सी संघर्ष कृती समिती यांनी केलेल्या सीएनजी बाटला दरवाढ कमी करण्यासाठी जे उपोषण केले त्यांनाही जाहीर पाठिंबा दिला. व सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग कल्याण, यांच्याही कार्यालयात जाऊन मोबाईल ने फोटो काढून रिक्षा चालकांवर लावणारे दंड कारवाई बंद करण्यासंदर्भात निवेदन पत्र दिले.
या वेळी सौ निलम निलेश व्यवहारे, आप रिक्षा टॅक्सी वाहतूक संघटना संस्थापक, श्री विनोद सुर्वे, श्री संतोष वराडे, अन्सार भाई, अकिफ डोलारे, श्री निलेश मुरलीधर व्यवहारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष - श्रमिक विकास कामगार संघटना तसेच अनेक रिक्षा टॅक्सी व्यवसायिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment