Saturday, 4 January 2025

*सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त* बहुजन विकास संघातर्फे महिलांचा सन्मान !


 *सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त* बहुजन विकास संघातर्फे महिलांचा सन्मान !

** ठाणे दि. ४ जानेवारी २०२५

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बहुजन विकास संघातर्फे ठाण्यात वाल्मिकी समाजातील महिलांचा सन्मान करण्यात आला. साठे वाडी येथे बहुजन विकास संघाच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सोनी चौहान यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ॲड मीना बागडी,  सविता भगवाने,  रितुका बाल्मिकी, मनिषा चिंडालिया आदी महिलांना यावेळी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी पुरूष कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.  

कार्यक्रमात “ स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने” ही प्रार्थना ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी सादर केली. व सत्यशोधक विचारांची कास धरून स्त्रियांना सक्षम करण्यासाठी समाजातील पुरूषांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.‌ या वेळी विविध महिला कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना सावित्रीमाईं बद्ल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बिरपाल भाल,  नरेश भगवाने, नरेश बोहित यांचीही भाषणे झाली. यावेळी मोठ्या संख्येने महिलां सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात राजेश चिंडालिया , राम वाल्मिकी, दिनेश मेहरोल, अनिल वैद आदी ही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

१७ जानेवारी रोजी आपलं प्रतिष्ठानचा *हळदी कुंकू समारंभ* आणि *भोंदू बाबा , साधू- महाराज यांच्याकडून होणारे महिलांचे शोषण* ह्या विषयावर मार्गदर्शन !

१७ जानेवारी रोजी आपलं प्रतिष्ठानचा *हळदी कुंकू समारंभ* आणि *भोंदू बाबा , साधू- महाराज यांच्याकडून होणारे महिलांचे शोषण* ह्या विषयावर मार्गदर...