Monday, 2 June 2025

हिंद भुमी टाईम्स च्या वतीने संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार २०२४ प्रदान !

हिंद भुमी टाईम्स च्या वतीने संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार २०२४ प्रदान !
 

मुंबई, (शांताराम गुडेकर) : हिंदी पत्रकार दिनानिमित्त  हिंद भुमी टाईम्स चे संपादक तथा समाजसेवक श्री.यूसुफ मन्सूरी
यांच्याकडून 2024 मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध क्षेत्रांतील पुरस्कार देऊन भिवंडी धामणकर नाका येथील सिटी सेंटर मॉलमध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य दै.स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार 2024 हिंद भुमी टाईम्स चे संपादक तथा समाजसेवक श्री.यूसुफ मन्सूरी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना, ज्यामध्ये डॉक्टर, पोलीस, पत्रकार, शिक्षक आणि वकील यांच्यासह इतरांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याला लोकांसमोर आणणे हा होता, जेणेकरून इतरांनाही सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा भिवंडी युवा मोर्चा अध्यक्ष राजू चौघुले, माजी नगरसेवक वसीम अंसारी, समाजसेवक अकरम मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक अनंता वाघ, वकील खदीजा खान (मुंबई उच्च न्यायालय), माहेनूर खान (मुख्याध्यापिका), पत्रकारांमध्ये डाॅ. श्री.किशोर बळीराम पाटील संपादक दै.स्वराज्य तोरण, फिरोज मेमन, अमृत शर्मा, आचार्य सुरजपाल यादव, संदीप गुप्ता, सोहेल अंसारी, सय्यद नकी हसन यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार यूसुफ मन्सूरी यांनी केले होते तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सज्जाद अख्तर यांनी केले.

No comments:

Post a Comment

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !! आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन ...