Sunday, 27 July 2025

मुरबाड पी.डब्ल्यु डी.ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेची चौकशी न झाल्यास १५ ऑगस्टला आत्मदहन करणार....

मुरबाड पी.डब्ल्यु डी.ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेची चौकशी न झाल्यास १५ ऑगस्टला आत्मदहन करणार....

*** पत्रकार प्रकाश जाधव यांचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना इशारा..

मुरबाड ( मंगल डोंगरे ) :- मुरबाड सार्वजनिक बांधकाम कार्यालय "शिवनेरी " शासकीय विश्रामगृहा समोर उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाला १२५ फुटांची मान्यता असताना फक्त चाळीस फुट उभारण्यात आल्याने ध्वजस्तंभात अनियमितता करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अधिक्षक अभियंता आणि उप अभियंता यांचेवर ध्वज संहिते नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार प्रकाश जाधव हे २०२३ पासुन लोक आयुक्त, मूख्य सचिव, यांचेकडे तक्रारी करुन दोन वेळा शेकडो कार्यकर्त्यांसह उपोषणे केली. परंतु या गंभीर प्रकरणाची चौकशी केली जात नसल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी मुरबाड तहसीलदार कार्यालया समोर होणाऱ्या ध्वजारोहण प्रसंगी आत्मदहन करुन राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्याचा इशारा राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे प्रकाश जाधव यांनी दिला असल्याने त्यांचे भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

         सार्वजनिक बांधकाम उप विभाग मुरबाड येथे लाखो रुपये खर्च करून सुसज्ज असा ध्वजस्तंभ असताना उप अभियंता कैलास पतिंगराव यांनी  शिवनेरी या शासकीय विश्रामगृहा समोर सुमारे १२५ फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्याचा घाट घातला त्यांची सुरुवात सप्टेंबर २०२२ मध्ये करुन जानेवारी अखेर चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारला आणि २६ जानेवारी २०२३ रोजी शासकीय कार्यालयात ध्वजारोहण न करता कोणत्याही प्रकारची परवानगी नसणाऱ्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण केले. मात्र त्या कामाला २ फेब्रुवारी ते मार्च २०२३ मध्ये प्रशासकीय मान्यता आणि दहा लाखांची तरतूद घेऊन त्यापुर्वीच काम पुर्ण झाले असल्याचा शिलालेख तेथे लावण्यात आल्याने राष्ट्रीय ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेचे एक प्रकारे प्रदर्शन झाले आणि सर्व प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्या असता तात्कालिन विधानसभा सदस्या यामिनी जाधव यांनी तसेच अनेक विधान सभा सदस्यांनी विधी मंडळात प्रश्न उपस्थित केला असता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खुलासा मागितला असता उप अभियंता कैलास पतंगराव यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे विधी मंडळास खोटा अहवाल सादर केला.
          मात्र १२५ फुटा ऐवजी केवळ चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्याचा सबळ पुरावा साक्ष देत असताना उप अभियंता कैलास पतिंगराव यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर ध्वज संहितेत नुसार कारवाई करण्यात यावी यासाठी प्रकाश जाधव यांनी राज्याचे लोक आयुक्त मुख्य सचिव, तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष ठाणे कोकण व मंत्रालय स्तरावर तक्रारी केल्या परंतु एकाही अधिकाऱ्याने या ध्वजस्तंभाची दखल घेतली नाही. त्यासाठी दोन वेळा शेकडो नागरिकांचे सहकार्याने उपोषणे केली परंतु कारवाई झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी दोषींना पाठिशी घालणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर ध्वजसंहिते नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार प्रकाश जाधव हे १४ किंवा १५ ऑगस्टला मुरबाड तहसीलदार कार्यालया समोर आत्मदहन करुन राष्ट्र ध्वजाला सलामी देणार असल्याचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर केले आहे.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...