Friday, 29 August 2025

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे ग्राहक फाउंडेशनच्या आवाहन !!

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे ग्राहक फाउंडेशनच्या आवाहन !!

        जयेश शेलार पाटील (महासचिव ग्राहक फाउंडेशन)

सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मिठाई पेढे यांसह दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणात विक्री होत असते व अशा पदार्थांना मागणी ही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे असे पदार्थ विकताना सुरक्षिततेची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यावी तसेच भेसळयुक्त पदार्थांची विक्री करू नये असे आवाहन ग्राहक संरक्षण फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

तर ग्राहकांना भेसळयुक्त पदार्थ आढळून आल्यास त्याची त्वरित तक्रार प्रशासनाकडे करण्यात यावी, असे आवाहनही ग्राहक संरक्षण फाउंडेशनकडून करण्यात आले आहे. 

सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाई पेढे व अन्य दुग्धजन्य पदार्थ यांची वाढती मागणी लक्षात घेता अनेकदा यामध्ये भेसळ करण्यात येते.

दुधामध्ये पाणी, साखर, कॉस्मेटिक पदार्थ, डिटर्जंट्स, युरिया, सोडियम क्लोराईड, अमोनियम क्षार, सॅलिसिलिक ऍसिड, बोरिक ऍसिड, मेलामाइन, हायड्रोजन पेरोक्साइड, फॉर्मल्डिहाइड आणि इतर रासायनिक पदार्थ मिसळले जातात. हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असून यामुळे मळमळ, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, यकृताचे आजार आणि मूत्रपिंडाचे आजार यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

तर मिठाईत कृत्रिम रंग (उदा. मेटॅनिल येलो), खवा, दूध, तांदळाचे पीठ (starch), आणि अॅल्युमिनियम फॉइल (रंगीत वर्खाऐवजी) मिसळले जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जास्त रंगीत, हाताला रंग लागणारी, किंवा चिकट पदार्थ असलेली मिठाई टाळावी.

अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे याबाबत ग्राहक फाउंडेशन कडून जनजागृती अभियान राबविण्यात येत असून अशा प्रकारची कोणतीही भेसळ आढळल्यास त्याची त्वरित तक्रार करावी असे आवाहनही करण्यात आले आहे. 

प्रतिक्रिया
मिठाईतील माव्यातील भेसळ दुधातील भेसळ तसेच मिठाईतील अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे अनेक आढळून येत आहे, त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

जयेश शेलार पाटील 
महासचिव ग्राहक फाउंडेशन,
+91 76202 56750

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...