Sunday, 3 August 2025

* "सिद्धार्थ महाविद्यालया'च्या विद्यार्थ्यांचे कर्जतच्या कोंडाणे बुद्ध लेणी येथे गिरीभ्रमण **

* "सिद्धार्थ महाविद्यालया'च्या विद्यार्थ्यांचे कर्जतच्या कोंडाणे बुद्ध लेणी येथे गिरीभ्रमण **

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या एन एस एसच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी कर्जत येथील कोंढाणे लेणी येथे गिरी भ्रमण (Trekking) आयोजन शनिवार दि. २/८/२०२५ रोजी  प्राध्यापक व कार्यक्रम अधिकारी डॉ. विष्णू ज. भंडारे यांच्या नेतृत्वात काही अनुभवी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने केले होते.

कोंडाणे लेणी महाराष्ट्राच्या मुंबईपासून जवळ असलेल्या कर्जत तालुक्यातील कोंडाणे गावाजवळील डोंगराच्या टेकड्यांमध्ये स्थित प्राचीन बौद्ध लेण्यांचा एक समूह आहे. इ. स. पूर्व पहिल्या शतकातील मानल्या जाणाऱ्या या लेण्यांमध्ये १६ दगडात कोरलेल्या छोट्या गुहा आहेत, ज्यात प्राचीन बौद्ध कला आणि संस्कृती दर्शविणारी शिल्पे आणि स्तूप आहेत. कर्जत रेल्वे स्थांनकापासून‌ कोंडाणे गाव फक्त १२ किलोमीटर अंतरावर आहे.

या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक विशेषत: पावसाळ्यात येत असतात. कारण येथील डोंगराळ भागात चोहीकडे पसरलेली हिरवळची चादर, पायथ्याशी वाहणारी नदी, छोटेमोठे धबधबे असे निसर्गरम्य वातावरण सर्वांनाच आकर्षित करते. याशिवाय आडवळणाची व निसरडी पायवाट असूनदेखील कोंडाणे गावच्या पायथ्यापासून उंचावरील लेण्यापर्यंत पोहचण्यासाठी अधूनमधून विश्रांती घेत निघाले तरी एक ते सव्वा तास लागतो. तेथे पोहचल्यानंतर‌  लेण्याच्या आतील छोटी विहारे व स्तूप पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. तसेच वरून पडत असलेल्या पाण्याच्या तुषरांचा जसा वर्षाव होतो त्याप्रमाणे  दोन धबधब्यांचे पाणी प्रत्येकालाच भिजण्यासाठी मोहीत‌ करतात, ज्याचा मनमुराद आनंद व अनुभव आपल्या विद्यार्थांनी घेतला.

अत्यल्प खर्चाची ही पावसाळी सहल तरुणांसह जेष्ठांसाठी देखील ट्रेकिंगसह ऐतिहासिक बुद्ध लेणी पाहण्यासाठी निश्चितच प्रसिद्ध ठिकाण आहे,असे आम्हांला वाटते. अनेक ट्रेकिंगचा अनुभव असलेले आमचे सिनिअर विद्यार्थी वैभव महाडिक, ऋषीकेश सौंदाळकर व सौरभ गुप्ता यांच्या पद्धतशीर नियोजनामुळे आमची हिरव्यागार निसर्गाच्या सहवासातील ही गिरीभ्रमण मोहीम यशस्वीरीत्या संपन्न झाली.

*-डॉ्. विष्णू भंडारे, मुंबई प्रतिनिधी*

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...