Monday, 25 August 2025

कल्याण प. टावरीपाडा केडिएमसी वॉटर फिल्टर रोड कायमस्वरूपी कचरा मुक्त करण्याची स्फूर्ती फाउंडेशन ची मागणी !!

कल्याण प. टावरीपाडा केडिएमसी वॉटर फिल्टर रोड कायमस्वरूपी कचरा मुक्त करण्याची स्फूर्ती फाउंडेशन ची मागणी !!

(समस्या न सुटल्यास आंदोलन करत ,ब‌ प्रभाग कार्यालयात कचरा टाकणार, ब प्रभाग क्षेत्र उपायुक्तांना निवेदन)

कल्याण, प्रतिनिधी - ब प्रभाग क्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर असलेला टावरीपाडा, केडीएमसी वॉटर फिल्टर रोड वर कायम कचऱ्याची ढिग जमलेला असतो टावरीपाडा गावाकडे जाणारा व तिथून गौरीपडावा तलावा कडे जाणारा अतिशय मुख्य असा रस्ता परंतु सदैव कचऱ्याच्या ढिग व त्यामुळे भटके कुत्रे, जनावरांचा वावर असतो, त्यामुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांना तोंडाला रुमाल व नाक बंद करून जावे लागते, हिच का ती स्मार्ट सिटी जिथे मुलभूत सुविधांचा वनवा‌ ? 

नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून ब प्रभाग क्षेत्र उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले यावर कायमस्वरूपी तोडगा निघाव व रस्त्यालगत सुशोभीकरण, वृक्ष कुंड्या ठेऊन कचरा फेकण्यास हा परिसर निषिद्ध करावा अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली असून यावर व प्रभाग क्षेत्रांच्या अधिकाऱ्यांकडून काय उपयोजना होते याची वाट आम्ही पाहत आहोत, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या हितार्थ, परिसर स्वच्छ रहावा यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागेल, सदर कचरा ब प्रभाग कार्यालयात आणून टाकू - अशी माहिती स्फूर्ती फाउंडेशन 'अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा तांगडकर' यांनी दिली.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...