Thursday, 23 October 2025

वनवासी कल्याण आश्रम उरण तर्फे दिवाळी निमित्त मिठाई व कपडे वाटप !!

वनवासी कल्याण आश्रम उरण तर्फे दिवाळी निमित्त मिठाई व कपडे वाटप !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
वनवासी कल्याण आश्रम उरण तालुक्याच्या वतीने हिंदूंचा मोठा सण दिपावली निमित्त मिठाई आणि कपडे वाटप करण्यात आले. लहूचीवाडी, कल्ले येथे मिठाई वाटप करून जनजाती बांधवांची दिवाळी गोड करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लहूचीवाडी, कल्ले येथील वनवासी कल्याण आश्रम चे कार्यकर्ते सुदाम पवार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ॲड आकाश शहा यांनी लहान मुलांचे खेळ घेतले,निकेतन ठाकूर यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. वनवासी कल्याण आश्रम उरण तालुका अध्यक्ष  मनोज ठाकूर यांनी वनवासी कल्याण आश्रम बद्दल आणि आश्रमा तर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमाबद्दल उपस्थित वाडीवरील बांधवांना माहिती दिली आणि ज्या मुलाची आश्रमात राहून शिकण्याची इच्छा आहे त्याला पुढील अभ्यासासाठी  कल्याण आश्रम खर्च करेल असे सांगितले. पाड्यात वयस्कर आजी आजोबांना मिठाई देताना त्यांच्या डोळ्यातील भाव पाहून सर्वांना समाधान वाटले. उपस्थित ३० भगिनींना नवीन साड्या, शाळेत जाणाऱ्या २५ मुलांना टोप्या, तसेच उपस्थित ३० बांधावाना टीशर्ट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा हितरक्षा प्रमुख सुदाम पवार, वनवासी कल्याण आश्रम उरण अध्यक्ष मनोज ठाकुर ,कार्यकर्ते ऍड आकाश शाह, अर्णव ठाकूर, निकेतन ठाकूर, सुरेश नायडू ही मंडळी वाडीवरील जनजाती बांधवांना आनंद देण्यासाठी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...