Thursday, 9 October 2025

निकृष्ट दर्जाची चेंबर ची झाकणे, शिवसेनेचा रुचिता नाईक आक्रमक...

निकृष्ट दर्जाची चेंबर ची झाकणे, शिवसेनेचा रुचिता नाईक आक्रमक...

नालासोपारा ता,९ :- शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांचा मागणीनुसार प्रभाग क्रमांक ११ मधील समेळ पाड़ा येथील तुटलेले चेंबर ची झाकणे बसवण्यात आली.
वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने बसविण्यात आलेले चेंबरची झाकणे अतिशय निकृष्ट दर्जाचे व गंजलेल्या व चेंबलेल्या लोखंडाची झाकणे बसल्याने स्थानिक नागरिकांनी तक्रार करताच शिवसेनेचा रुचिता नाईक यांनी पाहणी करून संबंधित अधिकारी यांना संपर्क करून त्वरित झाकणे बदलण्याचे आदेश दिले. निकृष्ट दर्जाच्या झाकणांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वारंवार तुटणारे चेंबरच्या झाकणांमुळे महापालिका बांधकाम विभागाचे संबंधित कंत्राटदारांच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेवर प्रश्‍न चिन्ह उपस्थित झाले आहे. येथील निकृष्ट दर्जाच्या कामांची पाहणी करण्यात यावी त्याचबरोबर परिसरातील दुरावस्थेतील चेंबर लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

चेंबरची झाकणे तुटल्याने  तक्रारीनंतर पुन्हा ती बदलण्यात आली, तरी काही दिवसानी पुन्हा तुटतात. हाच क्रम वर्षानुवर्षे सुरु आहे. ही झाकणे खरोखरच इतकी निकृष्ट दर्जाची असावीत की ती फक्त पादचाऱ्यांच्या भाराने तुटावीत? असा प्रश्‍न पडतो आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अशी मागणी शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...