Sunday, 5 October 2025

पनवेलमध्ये संविधान संवाद यात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन !!

पनवेलमध्ये संविधान संवाद यात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन !!

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : दिवंगत जेष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त एकता कॅटलीस्ट, कोकण श्रमिक संघ, व्यावसायिक विक्रेता संघ, आगरी शिक्षण संस्था आणि शाम म्हात्रे फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पनवेल मध्ये 'संविधान संवाद यात्रा' आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक  संविधान संवाद यात्रा, ११ वाजता सिकेपी हॉल समोर,प्रभू आळी शिवाजी रोड पनवेल येथे सर्वोदय कार्यालयाचे उदघाटन त्यानंतर आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे कामगार मेळावा आणि संविधानाचा जागर असे विविध उपक्रम, कार्यक्रम दिवसभरात संपन्न होणार आहेत.

या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे हर्षवर्धन सपकाळ, ओबीसी कमिटीचे अध्यक्ष भानूदास माळी, लोकशाहीर संभाजी भगत, माजी शिक्षक आमदार कपिल पाटील आणि डॉ. श्रीरंजन आवटे या सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

संविधानाच्या मूल्यांना व तत्त्वांना सर्वसमावेशक पद्धतीने पोहोचवण्याचा संविधान यात्रा, संविधान जागर कार्यक्रम हा महत्त्वाचा उपक्रम असेल.याशिवाय, शितल भंडारे यांच्या 'प्रबोधन कल मंच' तर्फे एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संविधानिक जागरूकता आणि सामाजिक प्रबोधनाला कलात्मक सादरीकरणाद्वारे स्पष्ट करणारा ठरेल.

पनवेलमधील सर्व संविधानप्रेमी नागरिक, संस्था आणि संघटनांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रुती म्हात्रे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...