पत्रकार श्री युवराज बच्छे यांना दर्पणरत्न' पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !!
चाळीसगाव, प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रिय नामांकन ( आय एस ओ 9001-2015). प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघ द्वारा आयोजित राज्यस्तरिय 'दर्पण रत्न' पुरस्कार २०२६ साठी कळमहू ता चाळीसगाव येथील पत्रकार व आदर्श समाज सेवक श्री युवराज नामदेव बच्छे यांची निवड करण्यात आली आहे. शोध पत्रकारीता व सामाजीक, शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी श्री युवराज बच्छे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना आता पर्यंत सामाजीक कार्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार तसेच शैक्षणीक कार्यासाठी सर्वपल्ली राधाकृष्ण शिक्षारत्न पुरस्कार तसेच भारत रत्न मा पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान पुरस्कार मिळाले आहेत: आहे वाम एसएस् इंडिया नुवी दिल्ली करून रिटायर्ड फौजीच्या संस्थेकडून राष्ट्रिय गौरव पुरस्कार मिळाला आहे.
हिन्दी मराठी पत्रकार संघ व दर्पण वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार, गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात येते यामध्ये पत्रकारीता, शिक्षण, साहित्य, सामाजीक, खेळ, राजकीय सौदर्श, डॉक्टर, वकिल, महीला, सहकार पतसंस्था, कला इ. क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानीत करण्यात येते. कळगडू येथील आदर्श समाज सेवक व पत्रकार भी युवराज नामदेव बच्छे यांना दि. ६ जानेवारी २०२६ रोजी मराठा मंगल कार्यालय मलकापूर जि. बुलढाणा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दर्पण रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment