Thursday, 25 December 2025

आगरी कोळी कॉमेडी जोडी भाग्यश्री रोशन घरत व रोशन दिनानाथ घरत "द्रोणागिरी भूषण" पुरस्काराने सन्मानित..!

आगरी कोळी कॉमेडी जोडी भाग्यश्री रोशन घरत व रोशन दिनानाथ घरत  "द्रोणागिरी भूषण" पुरस्काराने सन्मानित..!

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : कला क्षेत्रामध्ये अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल आगरी कोळी कॉमेडी जोडी  भाग्यश्री रोशन घरत व रोशन दिनानाथ घरत यांना २०२५ चा अतिशय प्रतिष्ठेचा "द्रोणागिरी भूषण" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खरं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री चा हात असतो असंच रोशन घरत यांच्या बाबतीत घडलं. रोशन घरत यांना वयाच्या १० व्या वर्षापासुन अभिनय क्षेत्रामध्ये काम करायची आवड, अभिनय हा त्यांचा आवडता विषय पण त्यांच्या पत्नीचा अभिनय हा विषय नव्हता. त्यांनी  आपल्या पत्नीला ५ वर्षापूर्वी तू माझ्यासोबत युट्यूब चॅनलवर काम करशील का अस म्हटलं पण पत्नीने त्यांना नकार नाही दिला त्या बोलल्या तुम्ही मला शिकवा मी काम करायला तयार आहे आणि आजतागत त्यांच्यासोबत २५ कॉमेडी  व्हिडिओ मार्फत सामाजिक संदेश देण्याच काम केलं तसेच इन्स्टाग्राम पेजवर पण  त्यांच्यासोबत कॉमेडी व्हिडिओ मध्ये काम करत आहेत.Roshan aanachi comedy या युट्युब चॅनलवर या दोघांनी आतापर्यंत २० व्हिडिओ मध्ये काम केलं आहे. सदर कला जोपासत असताना त्यांना बऱ्याच मंडळीने चांगले मार्गदर्शन केले अष्टगंध नाट्यमंडळाने "नाट्यकलाकार" म्हणून ओळख निर्माण करून दिली.बाबा लगीन, गावकज्या परक्यांची मज्जा,पैशाने तुटली नाती, आगरी पेठा या नाटकामध्ये काम करून प्रेक्षकांना पोटभरून हसवण्याचे काम रोशन घरत यांनी केले.

आगरी कोळी कॉमेडी कलाकार अमन वास्कर यांच्या सोबत जवळ पास ३५ कॉमेडी विडोओ मधे काम केले आहे. अमन वास्कर युट्युब चॅनल वर दोघांनी पण काम केलं आहे.बहिरानाथ कळाप्रेमी यु ट्यूब चॅनल, अष्टगंध कलामंच नाट्य मंडळ व युट्युब चॅनल वर पण काम केलं आहे तसेच पंकज ठाकूर विनायक माळी यांच्या चॅनल वर देखील काम करण्याची त्यांना संधी भेटली.रोशन घरत यांचा सुरुवातीचा प्रवास अतिशय खडतर होता, लोक नाव ठेवायची, तुला हे करता येईल का ? परंतु त्यांनी लोकांच्या निंदेला न लागता नाट्य क्षेत्रात आपल्या अभिनयाच्या जोरदार भरीव कामगिरी केली आहे. स्वतःच एक वलय निर्माण केलं आहे.आज यशाचा उत्तुंग शिखरावर नेवून ठेवलंय. हे सर्व काही काही असले तरी त्यांचे पाय मात्र जमिनीवरच आहेत.एक उत्कृष्ट नाट्य कलाकारासोबत एक उत्कृष्ट माणुसकीचा वसा जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. भाग्यश्री रोशन घरत व रोशन दिनानाथ घरत यांना २०२५ चा अतिशय प्रतिष्ठेचा "द्रोणागिरी भूषण" पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...