उमेदवारी अर्ज भरताना अर्चना संजय भालेराव यांची भव्य प्रचार रॅली ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!
घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १२६ मधून भाजप-शिवसेना -आर.पी.आय.(ए) महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चना संजय भालेराव यांनी मंगळवार(ता.३०)रोजी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढली.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृत नगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत या भव्य प्रचार रॅलीची सुरुवात घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार राम कदम, भाजप ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री - चंद्रकांत मालकर,भाजपच्या महिला मोर्चा घाटकोपर पश्चिम विधानसभा अध्यक्षा-सौ.पूनम बोराटे (नायर) तसेच शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यानंतर ही भव्य प्रचार रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक - आनंद नगर - गणेश मैदान - के.वि.के शाळा, उडपी हॉटेल, श्रेयस या मार्गे निवडणूक कार्यालय, पंतनगर इथपर्यंत काढण्यात आली. यावेळी या प्रचार रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांचा सक्रीय सहभाग आणि तरुणांची ऊर्जा पाहायला मिळाली असून हे पाहता आता हा विजय अटळ असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला असून, प्रभाग क्रमांक १२६ मधून जनतेचा स्पष्ट पाठिंबा मिळताना दिसत आहे. आपली साथ हीच आमची ताकद बनत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे यावेळी भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चना संजय भालेराव यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment