Friday, 26 December 2025

यु .ई. एस. ज्युनिअर कॉलेज यांनी रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ मध्ये प्रथम क्रमांक तसेच निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस !!

यु .ई. एस. ज्युनिअर कॉलेज यांनी रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ मध्ये  प्रथम क्रमांक तसेच निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस !!

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र शासनाच्या रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग - अलिबाग तर्फे दिनांक २३-१२-२०२५ ते २४-१२-२०२५ ह्या कालावधी मध्ये सेंट विल्फ्रेड स्कूल, शेडुंग, पनवेल येथे रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ आयोजन केले होते. ह्या प्रर्दशनामध्ये एकूण ४५ शाळा व कॉलेजने सहभाग घेतला होता. ज्यात यु. ई. एस. ज्युनिअर कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला तर निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले.  तसेच आता हा यु. ई. एस. चा प्रकल्प, राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्पासाठी पात्र ठरला आहे. 

विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी एसटीइएम ह्या विषयावर ज्यु. कॉलेजच्या  एकूण १५ विदयार्थ्यांनी प्रकल्प तयार करुन प्रदर्शनात सहभाग घेतला होता. ज्यास एकूण ४५ शाळा व कॉलेजमधून प्रथम क्रमांक मिळाला तर कु. भार्गवी मंदार जाधव हिस निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.  

ह्या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणारे ज्यु. कॉलेजचे  प्रतिक प्रशांत पाटील व कु. केतकी चंद्रविलास ठाकूर ह्यांचे व सर्व सहभागी विदयार्थ्यांचे यु .ई. एस. संस्थेचे कमिटी मेंबर्स व स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या व समन्वयक, माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका ह्यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. व आता थोड्याच दिवसांनी होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातही यु. ई. एस. चे विदयार्थी व शिक्षक घवघवीत यश मिळवून कौतुकास पात्र ठरतील, ह्यात तिळमात्रही शंका नाही.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...