सॅमसंग इंटिरिऍक्टिव्ह 9 पॅनल्स चे वाटत !!
उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : कै गो.ना.आक्षीकर विद्या संकुलातील जी.ई.आएस इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये ओएनजीसी प्लांट उरण आणि जनजागृती समाज प्रबोधन कार्य समिती यांच्या वतीने सॅमसंग इंटिरिऍक्टिव्ह 9 पॅनल्स चे वाटत करण्यात आले.
त्यासाठी ओएनजीसी प्लांट युनिट उरण तसेच प्रमुख अतिथी तसेच संजीव मोहन प्लांट मॅनेजर ओएनजीसी, भावना आठवले जीएम प्रमुख GR-ER, अनिल कांबळे, शाम पाडेकर, अभिषेक पाटील, संचालक मंडळ सदस्य तसेच शाळेचे स्कूल कमिटी सदस्य महेश म्हात्रे ,भोये सर, स्कूल कमिटी सदस्य भारंबे, माजी शिक्षिका कुमार मॅडम, जनजागृति व समाज प्रबोधन कार्य समितीचे अध्यक्ष राकेश गायकवाड, योगेंद्र शेट्टी अध्यक्ष NASEOH वर्किंग फॉर हॅंडीकॅप्पड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थित कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठया उत्साहाने सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment