Sunday, 11 January 2026

मालेवाडीच्या तरुणांची कौतुकास्पद सामाजिक बांधिलकी.. लोक वर्गणीतून रस्त्याची दुरुस्ती !!

मालेवाडीच्या तरुणांची कौतुकास्पद सामाजिक बांधिलकी.. लोक वर्गणीतून रस्त्याची दुरुस्ती !!

मालेवाडी, प्रतिनिधी.. तांदुळवाडीच्या अत्यंत खराब रस्त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. पण वाहनधारकास प्रचंड त्रास होत होता. अखेर गावातील तरुण पुढे आले आणि रस्त्याची दुरूस्ती करूनच ते थांबले. तरूण एकत्र आले तर काय करु शकतात याचे हे उत्कृष्ट उदाहरण होय. प्रवाशांकडून या  रस्ता दुरुस्तीमुळे नागरीकांच्या कडून कौतुक केले जात आहे. सविस्तर माहिती अशी की तांदूळवाडी या वाळवा येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गा पासून अडीच किमी अंतरावर मालेवाडी ता वाळवा हे गाव असून या गावातून गोटखिंडी बावची येथे वाहणं व प्रवासी नागरिक ये जा करत असतात मात्र तांदूळवाडी ते मालेवाडी रस्ता अत्यंत खराब झाला होता या बाबत येथील स्थानिक पातळीवरील राजकीय कार्यकर्ते यांनी वारंवार पाठपुरावा जिल्हा परिषद कडे केला पण त्यांच्या कडून दुर्लक्ष होत गेले मुळे मालेवाडी गावांतील तरूण तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुरेश घोरपडे, पोलिस पाटील सलिम मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य सरदार माने , माणिक पाटील, प्रदिप कोळेकर, विलास कोकाटे, भास्कर पाटील, रविंद्र माने, शहाजी खंडागळे, प्रमोद जाधव अजित क्षिरसागर, यांनी गावांतील लोकांच्या कडून लोकवर्गणी गोळा करून सिमेंट काँक्रीट च्या मिश्रणाणे रस्त्यावरील खड्डे मुजवून रस्ता सुरक्षित केला त्यामुळे वाहणं धारक, प्रवासी, व नागरिक त्या तरूणांचे कौतुक करत आहेत चौकट लोकमत ने वारंवार या खराब रस्त्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते त्यामुळे मालेवाडी गावांतील तरूणांनी एकजूट केली हा निर्णय घेतला असे मत गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश घोरपडे यांनी सांगितले आणि लोकमत मुळेच झाले असे त्यांनी सांगितले फोटो व्हाॅटसप वर टाकत आहे. लोकवर्गणी दिलेले व कौतुकास पात्र ठरलेले ग्रामस्थ पुढीलप्रमाणे आहेत.सुरेश घोरपडे, सलीम मुल्ला, रवींद्र माने, सरदार माने, संजय शेवाळे, नामदेव महाडिक, सचिन रासकर, धनाजी माने, आशिष पाटील, भास्कर पाटील, अर्जुन पाटील तांदुळवाडी, विलासराव कोळेकर, राजाभाऊ वाजे, प्रकाश खंडागळे, किरण बाळू माने, प्रियदर्शन मेथे, धनाजी क्षीरसागर, बाबासाहेब बांडे, आनंदा हुजारे, प्रकाश यादव, सचिन कोकाटे, जयसिंग पाटील सर, दत्तात्रय क्षीरसागर, अभिजीत पाटील, लक्ष्मण क्षीरसागर, नामदेव शिंदे सर, विजय जाधव, विनायक वाजे, सचिन वाघमारे, रामभाऊ वाजे, महादेव पाटील, प्रमोद जाधव, प्रशांत वाजे, हनुमान सूर्यवंशी, नितीन जाधव, सर्जेराव पाटील, संदीप कोकाटे, विजय घोरपडे, तुषार पाटील, अनिल वाजे, नामदेव सूर्यवंशी, कृष्णात माने, विजय शामराव घोरपडे, सुनील वाजे, प्रदीप कोळेकर, मधुकर पाटोळे, धनाजी पाटोळे, रायसिंग पाटील, तानाजी माने, महेश सूर्यवंशी, हंबीरराव तातोबा जाधव, माणिक पाटील, आदिनाथ पाटील हे आहेत.

सौजन्य - विलासराव कोळेकर सर 

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...