शिव वैभव कळंबट सडेवाडी चषक २०२६ क्रिकेट स्पर्धा यशस्वीपणे संपन्न !
प्रतिनिधी - निलेश कोकमकर
चिपळूण तालुक्यातील कळंबट गावातील सडेवामधील युवकांनी एकत्र येऊन मुंबई शहरात प्रथमच शिववैभव क्रिकेट संघ (सडेवाडी) आयोजित "शिववैभव चषक २०२६" भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी ओव्हल मैदान चर्चगेट येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक सामने २ ते ३ या षटकांचे खेळवण्यात आले. सर्व सामने मोठ्या उत्साहात आणि अगदी आनंदात पार पडले. या मध्ये भराडेवाडी क्रिकेट संघ राजापूर यांनी प्रथम क्रमांकाचे चषक आणि रोख रक्कम पारितोषिक पटकावले तर श्री. गणेश कृपा कुडूकवाडी यांनी द्वितीय क्रमांकाचे चषक आणि रोख रक्कम असे पारितोषिक पटकावले तर जय हनुमान क्रिकेट संघ मुर्तवडे देणवाडी यांनी तृतीया चषक आणि चंडिका क्रिकेट संघ केरे यांनी चतुर्थ क्रमांकाचे चषक पारितोषिक पटकावले. भराडेवाडी संघाचे केतन हा खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज आणि नितेश हा उत्कृष्ट फलंदाज चषकचे मानकरी ठरले. शिव वैभव चषक २०२६ साठी स्वइच्छेने काही देणगी स्वरुपात मदत लाभाली त्यामध्ये प्रथम चषक- कै. महादेव सोमा कोकमकर यांच्या स्मरणार्थ श्री. चंद्रकांत कोकमकर (कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखा अध्यक्ष), द्वितीय चषक-कु. प्रितम महेश वीर (कळंबट), तृतीय चषक - कु. श्रीनाथ सावित्री सिताराम केंबळे (केरे), चतुर्थ चषक- सायली आणि परी प्रदीप घाणेकर (कळंबट) उत्कृष्ट फलंदाज चषक - रुही दिपक बारगोडे (घवाळवाडी), उत्कृष्ट गोलंदाज चषक- नरेश बबन घाडे (गुहागर) गं. भा. वंदना बबन घाडे यांच्या स्मरणार्थ, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज टीशर्ट - YK SPORTS (रमेश दादा कोकमकर) चेंडू - तुकाराम घाणेकर, नाश्ता - परेश कोकमकर, मेडल -प्रवीण पांडुरंग कळंबटे, तसेच मैदानाच्या व्यवस्थेसाठी विजयदीप क्रिकेट संघ मुर्तवडे तांबेवाडी यांनी मोलाचे सहकार्य केले, त्याच बरोबर चंद्रकांत कोकमकर, रमेश कोकमकर, हर्षद कोकमकर, रितेश कोकमकर, विजय महादेव कोकमकर, गौरव कोकमकर, जयराम कोकमकर, संतोष सोनु घाणेकर, सचिन यशवंत घाणेकर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आणि शिव वैभव क्रिकेट संघाचे कर्णधार नितेश कोकमकर सह अमर कोकमकर, ओंकार धुमक, सागर निर्मळ, सुदेश कोकमकर, निषाद कोकमकर, प्रवीण कोकमकर, प्रसाद लिंगायत, मनोज कोकमकर, संदीप घाणेकर, प्रथमेश कोकमकर , मंगेश कोकमकर, प्रसाद कोकमकर, विघ्नेश कोकमकर यांची मेहतीने आणि शिव वैभव संघाचे सर्व सदस्य यांच्या सहकार्याने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी संपन्न झाले.
No comments:
Post a Comment