ईगल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रणरागिणी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !!
ईगल फाउंडेशनच्या वतीने ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त रणरागिणी पुरस्काराचे शानदार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये रणरागिणी पुरस्कार,गरुडझेप पुरस्कार, आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श माता-पिता आदी पुरस्कार देण्यात येणार आहेत. वैद्यकीय, शैक्षणिक, सरपंच, राजकीय, प्रशासकीय, उद्योग, युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील फक्त महिलांना अथवा महिला संस्थांना यामध्ये सहभाग घेता येईल.
*दि.31 जानेवारी 2026 पर्यंत* प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कार माहिती पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता. पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव, पत्ता, हुद्दा कळवावा. अधिक माहितीसाठी याच फोनवर (सायंकाळी सहा ते सात ) फोन करु शकता. त्यासाठी फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी सौ. शालन कोळेकर, सौ. सुलक्षणा बाबासाहेब राशिनकर(गुहागर),सौ. शर्वरी शेखर सुर्यवंशी (सांगली),सौ. मीरा महेश मोटे (धाराशिव ),प्रा. रिता शेटीया(पुणे ) सौ. संगिता शिंदे (सातारा),सौ. पुष्पावती प्रकाश वंजोळे (रत्नागिरी), सौ. मालती सुनील भावसार (नाशिक ), ॲड. रामरक्षा सोनार (मुंबई), सौ. मीरा संपतराव शिंदे (ईश्वरपूर), सौ. सुप्रिया भारस्वाडकर(पुणे ), सौ. रेश्मा मदनकर (नागपुर), प्रा. डॉ.अहिल्या वाघमोडे (कोल्हापूर ), सौ. शुभांगी अशोक शिंदे, ॲड. अनिशा फणसळकर(पुणे), सौ. अश्विनी दिनेश कांबळे (पलूस), सौ. प्राजक्ता प्रतापराव शिंदे (कोकरुड) यांनी पुरस्कार प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले आहे.
प्रसिद्धी करिता - विलासराव कोळेकर सर
No comments:
Post a Comment