दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !
सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित केलेले ध्वजारोहण श्री स्वप्नील पालांडे सर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी प्रभातफेरी तसेच तसेच उत्कृष्ट कवायत संचलन पार पडले. त्यानंतर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी कै. यतीन प्रेमजी वसंतजी देढीया मुंबई यांच्या स्मरणार्थ दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे यांना दोन ५५ इंची स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट देण्यात आले. श्री हिरेनभाई प्रवीणभाई शाह मुंबई, श्री स्वप्नील पालांडे मुंबई, श्री उमेश रहाटे वाटद यांच्या विशेष सौजन्याने ही भेट शाळेस प्राप्त झाली. यावेळी श्री स्वप्नील पालांडे सर, उद्योजक उमेश रहाटे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री पालांडे यांनी या शाळेची चौफेर प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. तसेच टेलिव्हिजन सेट देण्यामागील भावना व्यक्त केली. श्री अंतुले सर यांनीही मनोगत व्यक्त केले.सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी केले. तर सुत्रसंचलन श्री विनोद पेढे, रुमान पारेख व श्रीमती ऋतुजा जाधव यांनी केले. यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अजीज माद्रे व गनी खतीब, सदस्य हशमत निवेकर, इरा इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक इम्रान अंतूले, तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष दिलावर खान,अजीज मुल्ला, पत्रकार संकेत ढवळे, सरपंच सौ.उषा सावंत, उपसरपंच मुनाफ वागळे, सदस्य बानू खलफे, अनिल जाधव,कैलास तांबे, गंगाराम पवार, राजू सावंत सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य - विलासराव कोळेकर सर
No comments:
Post a Comment