नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!
** नागरिकांकडून जाहीर कौतुक
अंबरनाथ, विशाल कुरकुटे : वार्ड क्रमांक २९ ब मध्ये ग्रीन सिटी, वंदना हॉटेल पासून पनवेलकर क्लासिक सोसायटी पर्यंत रस्ता एकदम खराब होता, गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. दुचाकीस्वार, रिक्षाचालक, शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या गंभीर समस्येची दखल घेत प्रभागातील नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा दिला.
नवीन रस्ता झाल्याने परिसरातील वाहतूक सुरळीत झाली असून अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या कामाबद्दल परिसरातील नागरिकांनी नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांचे मनःपूर्वक कौतुक केले असून त्यांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment